शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संवादाचा अभाव धार्मिक सामंजस्यातील सर्वात मोठा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:42 IST

परस्परांशी संवाद नसणे हाच धार्मिक सामंजस्यातील सर्वात मोठा अडसर असून, आपली विचारप्रणाली व्यक्तिनिष्ठ न होऊ देणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी केले.

प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहदंबा साहित्यनगरी : ‘परस्परांशी संवाद नसणे हाच धार्मिक सामंजस्यातील सर्वात मोठा अडसर असून, आपली विचारप्रणाली व्यक्तिनिष्ठ न होऊ देणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी केले.येथील बगडिया इंटरनॅशनल येथे उभारलेल्या आद्य कवयित्री महदंबा साहित्यनगरीत आयोजित १२ वे तपपूर्ती अ. भा. महानुभाव साहित्य संमेलनात आज सायंकाळी झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. बडवे बोलत होते. ‘धर्म सामंजस्य : काळाची अपरिहार्य गरज’ विषयावरील या परिसंवादात अनिल शेवाळकर (कपाटे), प्रा. मा. रा. लामखडे, माजी वनमंत्री सुरेंद्र भुयार आणि प्रा. बसवराज कोरे यांनी सहभागी होवून विचार मांडले.प्रा. मा. रा. लाकखडे यांनी बहुधर्मी, बहुसंप्रदायी, बहुभाषी असलेल्या आपल्या देशातील परंपरा विसंवादी बनल्याने वातावरण कलुषित होत असल्याचे नमूद केले. एका बाजूला धार्मिक धु्रवीकरण तर दुसऱ्या बाजुला धर्मनिरपेक्षतेचा आग्रह हे वर्तमान वास्तव असून, त्यामुळे लोकशाही धोक्यात येण्याची चिन्हे असल्याचा इशारा देत प्रा. लामखडे म्हणाले की, धर्माने कट्टरतावादाने नव्हे तर समानतेच्या मार्गानेच सर्वांचे हित व कल्याण साधले जाऊ शकेल. धार्मिक सामंजस्यच प्रगतीला पोषक असते यावर त्यांनी भर दिला.अनिल शेवाळकर (कपाटे) यांनी श्री चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान व शिकवण या अंगाने लिखित भाषण वाचून दाखविले. पूर्वी आस्तिक व नास्तिक हे दोनच प्रवाह होते. परंतु, आता तिसरा स्वच्छंदी प्रवाह निर्माण झाला असून तो हावी होऊ लागला आहे.अध्यात्माच्या अंगाने त्यास अपेक्षित वळण देणे स्पष्ट आणि आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. प्रा. डॉ. ऋषिबाबा शिंदे यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक