व्यंकटेश्वर महादेव मंदिरावर कलशारोहण
मंठा : तालुक्यातील उस्वद देवठाणा येथील व्यंकटेश्वर महादेव मंदिर कलशारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्ताने हभप भगवान महाराज सेलूकर यांचे कीर्तन झाले. यावळी माजी सभापती सुरेश सरोदे, शंकर सरोदे, उपसरपंच कैलास सरोदे, गजानन घेटे, जनार्दन सरोदे, रामप्रसाद राऊत, रामजी चट्टे, आत्माराम सरोदे, रामदास सरोदे, गजानन राऊत यांच्यासह भाविक उपस्थित होते.
नाभिक सेवा संघाच्या वतीने अभिवादन
जालना : नाभिक सेवा संघाच्या वतीने वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष कृष्णा पंडित यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुणबी युवा मराठवाडा प्रदेश प्रवक्ते जयराम कदम, गणेश बावणे, दत्तात्रय वरपे, रामराव चव्हाण, राजू बावणे, किशोर भोसले, संभाजी चव्हाण, बाळू वीर, निखील वीर, ज्ञानेश्वर जाधव, विकास बोरडे, शुभम शिंदे, नारायण मोरे आदींची उपस्थिती होती.
वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीचे आयोजन
जालना : वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची ५ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राजकीय व संघटनात्मक विषयावर चर्चा केली जाणार आहे. शिवाय, इतर विषयांवरही चर्चा होणार आहे. बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ॲड. हर्षवर्धन प्रधान यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.