शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रणासाठी स्वच्छता ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:33 IST

नागरिकांनी स्वच्छता राखून बाहेर फिरताना स्वच्छ रूमाल बांधून फिरण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो स्वच्छतेचा त्यामुळे जालना पालिकेसह जिल्ह्यातील पालिका, जिल्हा परिषद तसेच एसटी महामंडळ, रेल्वे स्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य देण्यासह वैयक्तिक पातळीवरही नागरिकांनी स्वच्छता राखून बाहेर फिरताना स्वच्छ रूमाल बांधून फिरण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिल्या. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी बुधवारी गायकवाड यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.के.. राठोड यांनी प्रारंभी आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी यापूर्वीच घेतली आहे. संशयितांची तपासणी करण्यासह वेळप्रसंगी त्यांना अन्य रूग्णांपासून दूर ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक ते डॉक्टर तसेच औषधींचा साठाही मुबलक असल्याचे ते म्हणाले.जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांवर नजर ठेवणयसाठी आम्ही जाणीवजागृती केली आहे. एखाद्यास सर्दी, मोठ्या प्रमाणावर खोकला येऊन तो थांबत नसेल तर, अशा व्यक्तींनी तातडीने जवळच्या रूग्णालयात जावे अथवा जिल्हा सामान्य रूग्णालयात येऊन आरोग्य तपासणी करण्याची सूचनाही दिल्याचे राठोड म्हणाले. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेततील मुलांचे हॉस्टेल हे ताब्यात घेतले असून, वेळप्रसंगी संशयितास त्या भागात ठेवण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.एकूणच या बैठकीत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तसेच जालना पालिकेचे मुख्याधिकारी यांनाही विशेष सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी कचरा टाकताना तो घंटागाडीतच टाकण्याची सक्ती करण्यात आली असून,त्यासाठी घंटागाड्यांच्या फेरी वाढण्यिावरही चर्चा करण्यात आल्याचे निवृत्ती गायकवाड यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या अधिका-यांनाही बस स्वच्छ ठेवण्यासह प्रवाशांना काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने हातरूमालाचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज चालक तसेच वाहकांनी प्रवाशांना आवर्जून सांगावी.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्या तसेच प्रत्यक्ष गावातही स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी अधिकाधिक लक्ष देण्याचे सांगितले. उपमुख्याधिकारी लोंढे यांनी या बाबत जिल्हा परिषदेने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांना तत्पर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.आढावा : घाबरून न जाण्याचे आवाहनकोरोना व्हायरस हा जास्त म्हणजेच २५ डिग्री सेल्सियसमध्ये जिवंतच राहू शकत नाही. त्यामुळे सर्दी, खोकला झाल्यास आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, हा गैरसमज करून घेऊ नये. काळजी घेणे ही बाब नाकारून चालणार नाही. परंतु त्यामुळे भीती पसरेल असे कोणीही अफवा पसरवू नये असेही निर्देश यावेळी नागरिकांमध्ये द्यावेत, असे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोनाGovernmentसरकारHealth Tipsहेल्थ टिप्स