रेल्वे स्टेशन परिसरात कार्यक्रम
जालना : सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाजवळ प्रतिमापूजन करण्यात आले. स्वामी विवेकानंदाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यासाठी व स्मारक परिसराच्या विकासासाठी, स्वच्छतेसाठी स्वामी विवेकानंद स्मारक संवर्धन समिती गठीत करण्यात आली. यात प्रा. सोमिनाथ खाडे, धनंजय पाटील, सतीशचंद्र प्रभू, मुकुंद कुलकर्णी, विश्वंभर कुलकर्णी, सुरेश पोहार, महेश माळी, पंढरीनाथ पाचारे, किरण मुळे, कल्याण कुलकर्णी यांचा समावेश आहे. कार्यक्रमास सिद्धिविनायक मुळे, रवींद्र देशपांडे, डॉ. संजय रुईखेडकर, जगदीश गौड, रमेश देहेडकर, सुरेंद्र न्यायाधीश, दिनकर घेवंदे, सतीश अकोलकर, भगवानराव पुराणिक आदींची उपस्थिती होती.
---------
फोटो आहे
एस. के. इंग्लिश स्कूल
चंदनझिरा : येथील एस. के. इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज येथे प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष डॉ. विश्वंभर तनपुरे, सचिव पुष्पा तनपुरे, प्राचार्य हर्षवर्धन तनपुरे, मंगल पाचपोल, नागरे आदींची उपस्थिती होती.
----------
फोटो आहे
बदनापुरात मनसेतर्फे कार्यक्रम
बदनापूर : शहरात मनसेच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी गजानन गिते, संजय जºहाड, कैलाश खेंडके, सदाशिव सोळंके, संजय पवार, काळे, विनोद खेंडके, दामोधर जºहाड आदींची उपस्थिती होती.
--------------
दीपभारती विद्यालय, वडोद तांगडा
वडोद तांगडा : येथील दीप भारती मा. व उच्च माद्यमिक विद्यालयात प्रभारी मुख्यध्यापक एम. पी. पांडे यांनी प्रतिमापूजन केले. याप्रसंगी आर. जी. रवरात, एस. पी. रगडे, एस. के. भांबळे, एस. एस. गवळी, आर. के. लुटे, एस. आर. तांगडे, के. पी. म्हस्के यांची उपस्थिती होती.
-----------
फोटो आहे
प्राथमिक आरोग्य केंद्र, आष्टी
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिमापूजन करण्यात आले. डॉ. मनोज उबरहंडे यांनी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. खंदारे, औषधनिर्माता मनोज उबरहंडे, आरोग्य सहायक बी. ए. काळे, एस. एन. वाकळे, शाकीब जमिंदार, जे. बी. वाघमारे, अंजली गवळी, एस. के. गिते, ए. एम. जाधव, एम. डी. मोरे, एच. एम. राठोड, समशेर शेख यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
--------
फोटो आहे
ज्ञानज्योत विद्यालय, जालना
जालना : शहरातील ज्ञानज्योत विद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमाला मुख्याध्यापक सरकटे, खरात यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
-----
फोटो आहे
प्राथमिक शाळा, बोरगाव
भोकरदन : तालुक्यातील बोरगाव (ज) येथील प्रा. शाळेत आयोजित कार्यक्रमाला शालेय समिती अध्यक्ष राजेंद्र दांडगे, विष्णू लोखंडे, प्रदीप इंगळे, सचिन देशमुख, धनराज सोनुने यांची उपस्थिती होती.