शिक्षक सहकारी पतसंस्था
जालना : शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या शहरातील कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन मंगेश जैवाळ, सचिव अरुण जाधव, माजी चेअरमन बबनराव बोरूडे, विलास इंगळे, आर. पी. दावनगावकर, संचालक जगन्नाथ घुगे, जे. बी. शिंदे आदींची उपस्थिती होती.
---------
फोटो आहे
शिवाजी विद्यालय, दाभाडी
दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला पर्यवेक्षक बी. जी. डोळस, कनिष्ठ लिपिक केशव रगडे, वरिष्ठ लिपिक कृष्णा निकम, रमेश वायकोस, पंगज देशमुख, एन. एन. सोनट्टके आदींची उपस्थिती होती.
-----------
शिवजयंती उत्सव समिती, भोकरदन
भोकरदन : सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वप्रथम नगराध्यक्षा मंजुषा देशमुख, जि. प. सदस्या आशा पांडे, नगरसेविका वंदना तळेकर, नगरसेविका गयाबाई जाधव, पोलीस निरीक्षक काकडे यांनी प्रतिमा पूजन केले. दरम्यान, मॉसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला. यावेळी उत्सव समितीचे सदस्य नारायण जिवरग, नेव्हार, हर्षकुमार जाधव, सुरेश तळेकर, महेश पुरोहित, सुनील देशमुख, कमलकिशोर जोगदंडे, सोपान सपकाळ, संतोष अन्नदाते, नगरसेवक कदीर बापू, सलीम काजी, रमेश जाधव, अप्पासाहेब जाधव, बंटी औटी, विलास शिंदे, राजेंद्र दारूंटे, भगवान देठे, तुळशीराम लोखंडे, संजय साबळे, काकासाहेब साबळे, दिलीप देशमुख आदींची उपस्थिती होती.
---------
फोटो आहे
राजर्षी शाहू विद्यालय, पारध
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथील राजर्षी शाहू विद्यालय व महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजाराम डोईफोडे होते. याप्रसंगी आर्या अल्हाट हिने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती. मुख्याध्यापक विलास लोखंडे व प्राध्यापक मंगेश लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य अमोल बांडगे, सुधाकर सिरसाठ, अनिल लक्कस, राजेंद्र जाधव, नीलेश लोखंडे, विवेक अवसरमोल, भागवत पानपाटील, गजानन लोखंडे, संजय तबडे आदींची उपस्थिती होती. शुभांगी दांडगे हिने सूत्रसंचालन केले. जानवी पाटील हिने आभार मानले.
-----------
फोटो आहे
अंगवाडीत कार्यक्रम, रांजणी
रांजणी : येथील अंगणवाडीत प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रिया मांडवे, रजनीबाई देशपांडे, पद्मछाया वनगुजरे, मंगल देवकर, द्वारका बरवे, कमल वरखडे आदींची उपस्थिती होती.