शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथ दिंडीत जिजाऊसाहेबांनी वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:46 IST

शहरात दत्त मंदिर महानुभाव मस्तगड ते बगडिया इंटरनॅशनल लॉन्सपर्यंत संभाजी नगरमार्गे रविवारी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

विकास व्होरकटे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात दत्त मंदिर महानुभाव मस्तगड ते बगडिया इंटरनॅशनल लॉन्सपर्यंत संभाजी नगरमार्गे रविवारी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक- भक्तांनी व भजणी मंडळांनी या ग्रंथ दिंडीत सहभाग नोंदवून विविध अभंगाचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे यावेळी साक्षी पुंगळे या विद्यार्थिनीने जिजामाता मॉ. साहेब यांची भूमिका साकारून घोड्यावर स्वार झाली होती. यामुळे अनेकांचे लक्ष तिने वेधून घेतले होते.शहरात १२ वे तपपूर्ती अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार व सोमवारी असे दोन दिवस करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी रविवारी येथे ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अ. ह. साळुंके, आचार्य लोणारकर महाराज, आचार्य सुभद्रा अत्याशास्त्री, डॉ. बी. आर गायकवाड, भास्कर गाढवे यांच्याहस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले.यानंतर ग्रंथ दिंडीत सामील झालेल्याभाविकांनी व भजनी मंडळांनीगोपाला...गोपाला... देवकीनंदन गोपाला...यासह अनेक अभंग टाळ- मृदंगाच्या गजरात गायले. गोपाळ श्रीकृष्ण भगवान की जय अशा जयघोषांचा गजर करित ही ग्रंथ दिंडी दत्त मंदिर महानुभाव मस्तगड येथून निघाली. सुभाषचंद्र बोस चौक, भगवान महावीर चौक, मामा चौक, बसस्थानक व संभाजीनगर येथून गेलल्या ग्रंथ दिंडीचा समारोप बगडिया इंटरनॅशनल लॉन्स येथे झाला. दरम्यान तेलंगणा राज्यातून आलेल्या गांधेरी मंडळाने विविध पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.यावेळी अ. भा. महानुभाव साहित्य संमेलनाचे पुरूषोत्तम कारंजेकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष महंत प्रज्ञासागर महाराज, कार्यवाहक उद्धवराज प्रज्ञासागर, आचार्य लोणारकर महाराज, आचार्य जिंतूरकर महाराज, महंत भानुव्यास महाराज, महंत श्री मचाले महाराज, आचार्य श्री हंसराज खामणीकर आदी संत महंतांची उपस्थिती होती.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिकcultureसांस्कृतिक