शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

जालना शहरासह जिल्ह्यात दानवेंच्या विजयाचा फटाके फोडून जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:20 IST

रावसाहेब दानवे यांनी सुरुवातीपासून लीड घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. शहरातील संभाजीनगर येथील पक्षाच्या कार्यालयासमोर येऊन कार्यकर्त्यांनी जमा होऊन फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

जालना : सर्व माध्यमातून एनडीएला एक्झिट पोलमध्ये बहुमतापेक्षा जास्त जागा मिळेल अशी भविष्यवाणी वर्तविली होती. यामुळे निकालाची दिवशी काय होईल याची प्रतीक्षा उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांना होती. यामुळे सकाळपासूनच कार्यकर्त्यामध्ये धाकधुकीसह उत्साह दिसून आला.जशीजशी निकालाच्या फेऱ्या सुरु झाल्या त्यामध्ये रावसाहेब दानवे यांनी सुरुवातीपासून लीड घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. शहरातील संभाजीनगर येथील पक्षाच्या कार्यालयासमोर येऊन कार्यकर्त्यांनी जमा होऊन फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.देशभरात भाजपाने निकालात मुसंडी घेतल्याने कार्यकर्त्यानी शहरातील चौकाचौकात येऊन फटाक्याच आतषबाजी केली. हेच चित्र ग्रामीण भागात सुध्दा पहायला मिळाले. घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे तर सकाळी साडे आठ वाजल्यापासून टीव्हीच्या जमान्यात देखील रेडिओवर निकाला ऐकण्यासाठी गल्लीबोळात गर्दी केली होती. जाफराबाद तालुक्यातील माहोरा, भोकरदन तालुक्यातील केदारखेडा आदी ठिकाणी कार्यकर्त्यांनी भर उन्हात आतषबाजी करुन रावसाहेब दानवे यांच्या विजयाबद्दल आनंदोत्सव साजरा केला. तसेच मोदी आणि दानवे यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढून संभाजी महाराज चौक येथे कार्यकर्त एकत्र जमले होते. कार्यकर्त्यांनी वर्तविलेल्या भविष्यवाणीपेंक्षा जास्त जागा निवडून आल्याने हा विजय जनतेचा विजय असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले.खा. रावसाहेब रावसाहेब दानवे सलग पाचव्यांदा जालना लोकसभेत विजय झाल्याने नागरिकांनी फटाके फोडून गुरूवारी त्यांच्या विजयाचे स्वागत केले. यामुळे शहरातील काही परिसरामध्ये आनंददायी व चैतन्यमय वातावरण गुरूवारी तयार झाले होते.गुरूवारी सकाळपासून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.प्रत्येक जण टीव्ही, मोबाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून निकालाची आकडेवारी जाणूक घेण्याचा प्रयत्न करित होता.जसा- जसा उन्हाचा पारा चढत होता जणू काय त्याच प्रमाणे निकालाची आकडेवारी हाती येत होती.यात प्रत्येक फेरीत खा. रावसाहेब दानवे यांच्या पारड्यात मताधिक्य अधिक प्राप्त होत होते.दुपारनंतर दानवे यांचा दणदणीत विजय असल्याचे समजताच शहरातील भाग्य नगर, शनि मंदिर, लक्कडकोट परिसरात युवकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.राजुरात जल्लोषराजूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी विजय मिळवल्याचे जाहीर झाल्यानंतर राजूर येथे कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, गुलाल उधळत शिवाजी चौकात डीजेच्या तालावर जल्लोष साजरा केला.यावेळी भाऊसाहेब भुजंग, रामेश्वर सोनवणे, रतन ठोंबरे, विनोद डवले, राहुल दरक, आप्पासाहेब पुंगळे, गणेश पुंगळे, मुकेश अग्रवाल, ललित जोशी, समाधान पालोदे, हरिभाऊ काळे, बबन मगरे, विष्णू इंगोले, संतोष मगरे, अर्जून मांगडे, परमेश्वर कुमकर, नारायण पवार, परमेश्वर पुंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेहोते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालjalna-pcजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवे