शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात गुटखाबंदीला जुमानतोय कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 14:43 IST

शहरात सध्या सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असून याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ही बाब लोकमतने केलेल्या स्टिंग अॉपरेशनमधून उघडकीस आली.

- दीपक ढोले 

जालना :  राज्य सरकारने राज्यात गुटखा बंदी केली. गुटखाबंदी झाल्यानंतर सुरूवातीला काही काळ गुटखा उत्पादक धास्तावले होते. परंतु, शहरात सध्या सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असून याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ही बाब लोकमतने केलेल्या स्टिंग अॉपरेशनमधून उघडकीस आली.

राज्यात गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आली असून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही सरकारच्या वतीने  देण्यात आले आहेत. तरीही जालना शहरासह जिल्हाभरात सर्वत्र खुलेआम चढ्या भावाने गुटखा विक्री सुरू असून, शहरात गुटखा विक्रीचा घाऊक बाजार झाला आहे. शहरात किराणा मालाची दुकाने आणि पान टपऱ्यांवर सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. सोमवारी लोकमतने केलेल्या स्टिंग अॉपरेशनमध्ये ही बाब उघडकीस आली. यात विशेष म्हणजे उघडपणे गुटखा विक्री होत असून, याकडे अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. त्यामुळे गुटखा बंदी ही नावापुरती असल्याचे यातून उघड झाले आहे.

जिल्ह्यात खेडापाड्यांपासून ते शहरापर्यंत गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले आहे. दुकांन दारांनी गुटख्याचे दरही वाढविले आहे. यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडूनही कारवाई होतांना दिसत नाही. या भागात विक्रीवर कोणाचेच नियंत्रण नसल्यासारखी परिस्थिती दिसत आहे.हा गुटखा इतर राज्यातून येथे विक्रीसाठी येत असल्याचे बोलले जात आहे. यामुळै प्रशासना समोर आव्हान कायम आहे. 

भर दिवसा पुरविला जातोय मालछोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानांमधूनही परराज्यातून येणाऱ्या अनेक ब्रॅँडच्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असून, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत डोळेझाक करण्याची भूमिका घेत आहे. शहरात होलसेल गुटखा विकला जात आहे. विशेष म्हणजे भरदिवसा दुचाकीवर बॉक्स टाकून बिनधास्त लागेल, त्याला माल पुरवला जात असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग अॉपरेशनमध्ये आढळून आले. दरम्यान, या संदर्भात अन्न व औषधी प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, गुटखा विक्रीवर कारवाई सुरू आहे. परंतु आमच्याकडे कर्मचारी नसल्यामुळे कारवाई करण्यास विलंब होत आहे. शहरात लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागJalna Policeजालना पोलीसJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना