शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जालना पंचायत समिती राज्यात मॉर्डल ठरेल : राज्यमंत्री दादाजी भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 19:07 IST

जालना पंचायत समितीची इमारात राज्यातील इतर पंचायत समित्यासाठी मॉडेल ठरु शकते, अशा विश्वास  ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

जालना : जालनापंचायत समितीची इमारात राज्यातील इतर पंचायत समित्यासाठी मॉडेल ठरु शकते, अशा विश्वास  ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. ग्रामीण विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत जालना पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे गुरुवारी ना. मुसे यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोर्ंट्याल,  जि. प. उपाध्यक्ष सतीष टोपे, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, जि. प. माजी अध्यक्ष पंडीत भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना राज्यमंत्री भुसे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी मी आणि अर्जुन खोतकर नेहमी प्रयत्न करणार आहोत. आज ग्रामविकास मंत्र्याच्या तालुक्यात नसणारी पंचायत समितीची इमारत जालन्यात होत आहे. त्यामुळे याचा नखीच विकासासाठी फायदा होणार आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचे घर व्हावे, यासाठी केंद्र सरकारने प्रंधानमंत्री आवास योजना सुरु केली.

सध्या गावा - गावात सर्वे करण्यात येत आहे. परंतु, काही नागरिकांना जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न अपुर्णच राहात होते. यासाठी काही दिवसापूर्वीच सरकारने एक निर्णय घेतला आहे. यात २०११ अगोदर ज्या नागरिकांनी गायरान जमीनींवर कब्जा केला आहे. त्यांना त्या जमीनी देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्यांची नोंदणी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.  एखाद्या ग्रामसेवकांने नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ केली तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. मालेगावातील अतिक्रमण धारकांना जमींनी मिळाव्या यासाठी मी २००५ पासून पाठपुरावा करत होतो. महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने बॅकांना कर्ज तसेच महिलाचे खाते उघडण्यासाठी बॅकांनी एक दिवस देण्याचे आदेशही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी सभापती सुमन घुगे, रघूनाथ तौर, पांडूरंग डोंगरे, दत्ता बनसोडे, ए. जे. बोराडे, पं.स. सदस्य संतोष मोहिते, जनार्दन चौधरी, सुनिल कांबळे, कैलास उभाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, गटविकास अधिकारी मिना रवताळे, कार्यकारी अभियंता के. बी. मराठे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाState Governmentराज्य सरकारpanchayat samitiपंचायत समिती