शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जालना नगरपालिकेने बजावली कंपनीला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:33 IST

जालना नगर पालिकेचा जालना तालुक्यातील सामनगाव येथे घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम गेल्या नऊ वर्षापासून रखडल्याने, या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळणारा ५० लाखाचा निधी अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगर पालिकेचा जालना तालुक्यातील सामनगाव येथे घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम गेल्या नऊ वर्षापासून रखडल्याने, या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळणारा ५० लाखाचा निधी अडचणीत सापडला आहे.जालना शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मितीसह कचºयाची शास्त्रशुद्ध पध्दतीने विल्हेवाट लावन्यासाठी चार कोटी रूपयांचा हा प्रकल्प मंजूर करण्यात होता. त्यात प्रारंभीपासून या ना त्या कारणाने वाद होत गेले. हा प्रकल्प पुणे येथील एका कंपनीला पूर्णत्वासाठी देण्यात आला होता. मात्र मध्यंतरी जालना पािलकेकडूनही या कंपनीला हव्या असलेल्या मूलभूत सुविधा देण्यास विलंब झाल्याने देखील या प्रकल्पाचे काम रखडले आहे. एकूणच हा प्रकल्प अपूर्ण राहिल्याने आजही नगर पािलकेला कचºयाची विल्हेवाट लावण्याची डोकेदुखी कायम आहे. शहराजवळ असलेल्या डपिंग ग्राऊंडवर कचºयांचे ढीग जमा झाले आहेत. जालना येथील हा महत्वकांक्षी प्रकल्प असल्याने याला केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुक्रमे ५० लाख रूपये मिळणार होते. परंतु केंद्र सरकारकडून हा निधी खर्चाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने थांबविण्यात आल्याची चर्चा आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी पुढकार घेण्याची गरज आहे.प्रकल्प रखडला : पालिकेकडून दंडपुणे येथील घनकचरा प्रकल्पाचे कंत्राट घेतलेल्या संबंधित कंपनीला वेळेत प्रकल्प पूर्ण न केल्याने जालना पालिकेने प्रथम दंड आकारला होता. मात्र दंड आकारूनही काम न केल्याने कंत्राट रद्द का करण्यात येऊ नये अशा प्रकारची नोटीस बजावल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नJalanaजालना