शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
2
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
3
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
5
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
6
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
7
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
8
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
9
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
10
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
11
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
12
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
13
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
14
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
15
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
16
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
17
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
18
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
19
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
20
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
Daily Top 2Weekly Top 5

जालना पालिका @ १०२ ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:02 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजने अंतर्गत बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ अंकांनी झेप घेतली असून, गेल्यावर्षी जालना पािलकेचा क्रमांक १४२ वर होता, तो आता १०२ वर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजने अंतर्गत बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ अंकांनी झेप घेतली असून, गेल्यावर्षी जालना पािलकेचा क्रमांक १४२ वर होता, तो आता १०२ वर आला आहे. आम्हाला पहिल्या शंभरमध्ये येण्यासाठीचे प्रयत्न होते, मात्र ते शक्य झाले नाही. असे असले तरी आमची ही प्रगती देखील आम्हांला नवीन ऊर्जा देणारी असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केली.जालना शहर स्वच्छतेसाठी आज घडीला ५२ घंटागाड्या असून, पालिकेचे ३०० तर खाजगी तत्त्वावर २०० मजुरांना सोबत घेऊन शहरातील सर्व रस्ते दररोज साफ केले जातात. यासाठी १८ ट्रॅक्टर असून, वैयक्तिक शौचालये बांधण्यावरही भर दिला जात आहे. जालन्यातील घनकचरा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने आमचे ४०० गुण कमी झाल्याची खंत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केली. दरम्यान, सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प आता नव्याने पूर्ण करण्यासाठी साडेचार कोटी रूपयांचे टेंडर काढले असून, हे काम येत्या सहा महिन्यांत मार्गी लागणार आहे.शहरातील कचरा उलचलून सारवाडी मार्गवरील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो, तो यापुढे तेथे न टाकता ते ग्राऊंड पूर्ण स्वच्छ करून तेथे बाग उभारण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहेत.आता जालनेकरांना स्वच्छतेसाठी दररोज सर्व प्रभागांत जिंगल बेल असलेली घंटागाडी दोनवेळेस फिरवली जात आहे, त्यामुळे शहरातील रस्ते, चौकातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे.आता या घंटागाडीला महिलांच्या सुविधेसाठी सॅनेटरी नॅपकिन तसेच लहान मुलांचे डायपर टाकण्यासाठी स्वतंत्र लालडबा बसवण्यात येणार आहे. सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट लावताना महिलांची मोठी मुस्कटदाबी होते, ती यापुढे होणार नाही.जालना : राज्य अमृतमध्ये ३० व्या स्थानी४केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर अर्थात अमृत योजनेत देशातील एक लाख लोकसंख्या असलेल्या ४२५ नगर पालिकांनी सहभाग घेतला होता. त्यात जालना नगर पालिका ही १०२ व्या स्थानावर आहे. तर राज्य सरकारच्या अमृत योजने अंतर्गत महाराष्ट्रातील ४५ नगर पालिकांचा सहभाग होता, त्यात जालन्याने ३० वा क्रमांक मिळविला आहे. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी जशी प्रशसनाची जबाबदारी आहे, तशीच ती जालन्यातील नागरिकांचीही आहे. त्यामुळे सर्वांनी मानसिकता बदलून एकत्रित येऊन शहर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा, जालना

टॅग्स :government schemeसरकारी योजनाJalana Muncipalityजालना नगरपरिषद