शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जालना बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:34 IST

सोने स्वस्त, तर चांदीचे दर स्थिर जालना : मागील आठवड्यात अंदाज वर्तविल्यानुसार तेल, तुपाच्या दरात विक्रमी तेजी आली. ...

सोने स्वस्त, तर चांदीचे दर स्थिर

जालना : मागील आठवड्यात अंदाज वर्तविल्यानुसार तेल, तुपाच्या दरात विक्रमी तेजी आली. सर्व प्रकारच्या डाळी, शेंगदाना, साबूदाणा देखील महागला. सोयाबीन आणि हरभऱ्यांचेही दर वाढले. सोने मात्र काही प्रमाणात स्वस्त झाले असून, चांदीचे दर स्थिर आहेत. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी खाद्य तेलाची आयात थांबविणे आवश्यक असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. त्याचवेळी तेल, तुपाच्या दरात मोठी वाढ होणार, याचा अंदाज आला होता. त्याप्रमाणे तेलाच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांची, तर तुपाच्या दरात डब्यामागे १०० रुपयांची तेजी आली. तेजीची घोडदौड पुढेही सुरूच राहील, असे बोलले जाते. सध्या तेलावरील आयात शुल्क वाढविल्यामुळे आणि रुपया कमजोर झाल्यामुळे तेलाच्या दरात तेजी आली, असे काही जाणकारांचे मत आहे.

पामतेल १२५००, सोयाबीन तेल १२८००, सरकी तेल १२८००, सूर्यफूल तेल १५८००, करडई तेल १७००० आणि शेंगदाणा तेलाचे दर १६००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. वनस्पती तुपाचे दर १५०० ते १७०० रुपये प्रतिडबा असे आहेत.

सर्व प्रकारच्या डाळी प्रत्येकी २०० रुपयांनी महागल्या. हरभरा डाळ ५६०० ते ५९००, मूग डाळ ९००० ते ९७००, उडीद डाळ ९००० ते १०००० आणि मसूर डाळीचे दर ६५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

पुढील आठवड्यात महाशिवरात्र असल्यामुळे शेंगदाणा, साबुदाणा तसेच उपवासाचे पदार्थ महागले आहेत. शेंगदाणा ९५०० ते १०५००, तर साबुदाण्याचे दर ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

गुळाची आवक दररोज ५ हजार भेली इतकी असून, भाव २६७५ ते ३१५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. साखरेचा मार्च महिन्याचा कोटा २१ लाख टन इतका जाहीर करण्यात आला. त्यामुळे साखरेचे दर नियंत्रणात राहतील, असा अंदाज आहे. सध्या साखरेचे दर ३२५० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सोयाबीनची आवक दररोज ५०० पोते इतकी असून, २०० रुपयांच्या तेजीनंतर भाव ४९५० ते ५०५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्धता कमी असल्यामुळे सोयाबीनच्या दरात तेजी आल्याचे बोलले जाते.

सटाेरियांची पकड मजबूत झाल्यामुळे हरभऱ्याच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. चालू रब्बी हंगामात महाराष्ट्रात हरभऱ्याचे उत्पादन २४.६७ लाख टन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. मात्र तरीही हरभरा महागणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या हरभऱ्याची आवक दररोज ८०० पोते इतकी असून, १५० रुपयांच्या तेजीनंतर भाव ४४०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. येत्या १५ मार्चपासून देशभरात सरकारच्या वतीने हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात येईल, असे कळते.

मागील काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. सध्या सोने तोळ्यामागे २ हजार रुपयांनी स्वस्त झाले असून, भाव ४८ हजार रुपये प्रतितोळा असे आहेत. चांदीचे दर स्थिर म्हणजे ७० हजार रुपये प्रतिकिलो असे आहेत. चांदीच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे.

गव्हाची आवक दररोज ८०० पोते इतकी असून, भाव १६५० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज १२०० पोते इतकी असून, भाव ११५० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. बाजरीची आवक दररोज २०० पोते इतकी असून, भाव ११४० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. मक्याची आवक दररोज ५०० पोते इतकी असून, भाव १२५० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तुरीची आवक दररोज १००० पोते इतकी असून, भाव ६४०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.