शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात रेडिमेड फराळावर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 19:04 IST

: दिवाळी सणानिमित्त रेडीमेड फराळ विक्री करत असलेल्या दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

जालना : दिवाळी सणानिमित्त रेडीमेड फराळ विक्री करत असलेल्या दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, वाढत्या मागणीमुळे पदार्थांचा दर्जा राहत नाही. परिणामी विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत म्हणून अन्न व औषधी प्रशासनाने मोहीम सुरु केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेडीमेड फराळ विके्रत्यांवर आता करडी नजर राहणार आहे. 

पूर्वी फराळाचे विविध साहित्य घरोघरी बनविण्यात येत होते. मात्र, धकाधकीच्या काळात घरातून फराळ तयार करण्याचे प्रमाण कमी झाले. यामुळे अनेकांचा रेडीमेड फराळ खरेदीकडे कल वाढला आहे. दर्जाहीन साहित्य वापरून तयार करण्यात आलेली मिठाई आणि फराळ आरोग्यास अपायकारक आहे. यामुळे आत्तापासूनच अन्न आणि औषधी प्रशासनाने खबरदारी म्हणून परिसरातील मिठाईचे दुकानाची तपासणी मोहिम हाती घेतली आहे. तसेच हंगामी फराळ विक्रेत्यांनाही नोंदणी बंधनकारक करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त एस. ई. देसाई यांनी सांगितले. 

दिवाळीतील फराळ हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो. बाजारपेठेतही दिवाळीच्या अनुषंगाने मिठाईच्या दुकानांत विविध खाद्यपदार्थांची रेलचेल दिसून येते. विविध संस्थांकडून व हंगामी विक्रेत्यांकडूनही दिवाळी फराळ विक्र ीची दुकाने थाटण्यात आली आहेत. सध्याच्या धावपळीच्या काळात अनेक महिला नोकरी करत असल्याने घरीच दिवाळीचे पदार्थ बनवण्याऐवजी रेडिमेड मिळणारे फराळाचे साहित्य खरेदी करतात. मात्र हे पदार्थ चांगल्या पध्दतीने तयार करण्यात आले आहेत का? पदार्थाचा दर्जा कसा आहे, पदार्थाची गुणवत्ता, ते किती काळ टिकू शकतात यावर नेहमी प्रश्नचिन्ह असते. अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी अन्न औषध प्रशासनाकडून प्रत्येक सणासुदीच्या काळात  तपासणी मोहीम हाती घेण्यात येते. 

आॅनलाईन नोंदणी गरजेचीछोट्या व्यावसायिकांना चलन भरून आॅनलाईन पध्दतीने नोंदणी करावी लागणार आहे. मिठाई तसेच रेडीमेड फराळ खरेदी करताना ग्राहकांनी खबरदारी घ्यावी. -एस. ई. सहाय्यक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, जालना.

टॅग्स :JalanaजालनाFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागfoodअन्न