शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात सात वसतिगृहांसाठी मिळणार साडेदहा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:46 IST

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत मुलींचे वसतिगृह योजनेतून जिल्ह्यात सात ठिकाणी मुलींच्या वसतिगृहांसाठी शासनाने १० कोटी ५० लाखांचा निधी शुक्रवारी मंजूर केला. या निधीतून उभारण्यात येणाºया वसतिगृहात माध्यमिक शिक्षण घेणाºया जिल्ह्यातील सातशे मुलींच्या निवासाची सोय होणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान : सातशे मुलींची होणार सोय; सात तालुक्यांत प्रत्येकी एक वसतिगृह उभारणार

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत मुलींचे वसतिगृह योजनेतून जिल्ह्यात सात ठिकाणी मुलींच्या वसतिगृहांसाठी शासनाने १० कोटी ५० लाखांचा निधी शुक्रवारी मंजूर केला. या निधीतून उभारण्यात येणाºया वसतिगृहात माध्यमिक शिक्षण घेणाºया जिल्ह्यातील सातशे मुलींच्या निवासाची सोय होणार आहे.केंद्र शासनाच्या अकराव्या पंचवार्षिक योजना कालावधीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणापासून मुली वंचित राहू नये, यासाठी नववी ते १२ मध्ये शिकणाºया विद्यार्थिनींच्या निवासाकरिता शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत भागात मुलींचे वसतिगृह बांधण्याची योजना सुरू केली आहे.यामध्ये १४ ते १८ वयोगटातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणाºया १०० मुलींसाठी एक या प्रमाणे वसतिगृहांच्या बांधकामास २०११ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानुसार जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर, मंठा, भोकरदन, अंबड, बदनापूर आणि जालना या सात तालुक्यातील ७०० मुलींच्या माध्यमिक शिक्षण व निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नवीन किमतीनुसार वसतिगृह बांधकामासाठी अतिरिक्त साडेदहा कोटींचा निधी आवश्यक होता. त्यास शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत मुलींचे वसतिगृह बांधणे ही केंद्र शासनाची योजना आहे. बांधकामासाठी लागणाºया खर्चात केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के हिस्सा आहे.राज्याच्या हिश्श्यातून मंजूर या निधीतून सातही तालुक्यातीलप्रत्येकी शंभर मुलींच्या राहण्याची सुविधा होईल, अशी सातवसतिगृहे उभारण्यात येणारआहेत.