शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्हा रूग्णालयातील १०० किलो व्हॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प झाला सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:16 IST

जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध झालेल्या ८० लाख रूपये निधीतून येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध झालेल्या ८० लाख रूपये निधीतून येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. १०० किलोव्हॅटच्या प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेवर रूग्णालयातील सर्व उपकरणे चालत आहेत. विशेषत: साडेसहा हजार लिटरचे सौर उष्ण जल संयंत्रणही सुरू करण्यात आले असून, अंतररूग्ण विभागातील रूग्णांना गरम पाणी मिळू लागले आहे.जालना येथील २६० खाटांच्या या शासकीय रूग्णालयात दैनंदिन ३०० वर रूग्ण उपचारासाठी दाखल असतात. तर बाह्यरूग्ण विभागात दीड ते पावणेदोन हजार रूग्ण उपचारासाठी येतात. जिल्हा रूग्णालयातील विजेवर चालणाºया उपकरणांसाठी महावितरणची वीज वापरली जात होती. यासाठी जिल्हा रूग्णालयाला सहा ते सात लाख रूपयापर्यंत महिन्याला वीजबिल भरावे लागत असे.अत्यावश्यक सेवेपैकी एक असलेल्या जिल्हा रूग्णालयात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला होता. मंजूर निधीपैकी जवळपास ८० लाख रूपये खर्च करून १०० किलोव्हॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. यात आयपीडी, आयसीयू विभागाच्या इमारतीवर ५० किलोव्हॅटचा, ओपीडी विभागावर ३० किलो व्हॅटचा, नर्सिंग ट्रेनिंग सेंटरवर १० किलोव्हॅटचा तर नेत्र विभागाच्या इमारतीवर १० किलो व्हॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पातून वार्षिक सरासरी दिवसाकाठी ३५० ते ३७० युनिट विज निर्मिती होत आहे. या प्रकल्पामुळे रूग्णालयाला येणाºया वीजबिलातून सुटका झाली असून, सध्या एक ते दीड लाखा पर्यंत वीजबिल येत आहे. जिल्हा रूग्णालयातील अंतररूग्ण विभागात उपचार घेणाºया रूग्णांना, नर्सिंग सेंटरमधील विद्यार्थीनींना गरम पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ६५०० लिटरचा सौर उष्ण संयंत्र कार्यान्वित करण्यात आला आहे. एक संयंत्र अंतररूग्ण विभागाच्या इमारतीवर तर दुसरा नर्सिंग ट्रेनिंग सेंटरच्या इमारतीवर सुरू आहे.

टॅग्स :Jalanaजालनाhospitalहॉस्पिटलelectricityवीज