शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर निलंबित; मंत्री तानाजी सावंतांचे आदेश

By विजय मुंडे  | Updated: December 27, 2022 15:39 IST

आ. नारायण कुचे यांचा तारांकित प्रश्न; आरोग्य सचिवांमार्फत होणार चौकशी

जालना : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जालन्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ. विवेक खतगावकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले. कोरोना काळातील साहित्य खरेदी, महिलांबाबतचे गैरवर्तन आदींबाबत बदनापूरचे आ. नारायण कुचे यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरावेळी हे आदेश देण्यात आले. डॉ. खतगावकर यांची आरोग्य सचिवांमार्फत चौकशी करण्याचेही आदेश आरोग्यमंत्री सावंत यांनी दिले.

बदनापूरचे आ. नारायण कुचे यांनी हिवाळी अधिवेशनात डॉ. विवेक खतगावकर यांच्या भ्रष्टाचार व गैरवर्तणुकीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केले होते. कोरोना कालावधीत ॲंटिजन किट, पीपीई किट, थर्मल गन, सॅनिटायझर, मास्क आदी विविध साहित्यांची अवाजवी खरेदी करणे, केवळ १५ दिवस वापर करून ते साहित्य गोदामात धूळखात पडणे, अव्वाच्या सव्वा दराने निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी करणे, खरेदी केलेले अनेक साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांपर्यंत न पोहोचणे, खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार आदींबाबत आ. कुचे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. महिला कर्मचाऱ्यांशी डाॅ. खतगावकर हे अरेरावी, गैरवर्तन करीत असल्याची तक्रार करीत आजच डॉ. खतगावकर यांना निलंबित करणार का? औरंगाबाद येथे झालेली चौकशी पुन्हा सुरू करणार का? महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून गैरवर्तनाची चौकशी करणार का? डॉ. सतीश पवार, डॉ. अर्चना पाटील या सेवानिवृत्तांना गरज नसताना कंत्राटी तत्त्वावर कर्तव्यावर घेतले असून, त्यांना कामावरून काढणार का? असे प्रश्न उपस्थित केले होते.

आ. कुचे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी डॉ. विवेक खतगावकर यांना आजच निलंबित करीत असल्याचे सांगितले. तसेच आरोग्य सचिव, दोन संचालकांमार्फत चौकशी समिती नेमणे, महिला डॉक्टरांचा सहभाग असलेल्या पथकामार्फत गैरवर्तनाची चौकशी करण्यास समिती नेमण्याचे आदेश दिले. शिवाय कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या डॉ. सतीश पवार, डॉ. अर्चना पाटील यांना कामावरून कमी करण्यात येत असल्याचेही सावंत यांनी यावेळी सांगितले.

येताना साखर घेऊन यासकाळी आल्यानंतर संध्याकाळी या, असे कर्मचाऱ्यांना सांगितले जाते आणि येताना साखर घेऊन या, असे सूचित केले जाते. साखर एक किलो आणा, दोन किलो आणा, शंभर किलो आणा, अशी बोलण्याची पद्धत असल्याचे सांगत आ. नारायण कुचे यांनी डॉ. विवेक खतगावकर यांच्या भ्रष्टाचाराचा पाढाच यावेळी वाचला.

तत्कालीन आरोग्य मंत्र्यांवर निशाणाडॉ. विवेक खतगावकर यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केल्या. परंतु, तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी डॉ. खतगावकर यांना पाठीशी घातले. ते आमच्या जिल्ह्यातील होते असे सांगत आ. कुचे यांनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर थेट निशाणा साधला.

टॅग्स :JalanaजालनाTanaji Sawantतानाजी सावंतdoctorडॉक्टर