शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जालना जिल्ह्यातील आरोग्य विभाग सलाईनवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:27 IST

जिल्हा सामान्य रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयातील वर्ग एक ते तीनची तब्बल १२२ पदे रिक्त आहेत

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याच्या आरोग्याचा भार असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयातील वर्ग एक ते तीनची तब्बल १२२ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवाच सलाईनवर आली असून, याचा रूग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे.उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यात केंद्र, राज्यात सत्ता असलेल्या पक्षातील मातब्बर मंत्री आहेत. विरोधी बाकावर बसणारे तगडे विरोधकही आहेत. राज्य, केंद्राच्या पटलावर राजकीय वजन असले तरी सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या आरोग्य विभागातील मुलभूत सोयी-सुविधांसह रिक्तपदांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून कायम आहे.विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर आरोग्याची सेवा देणाºया ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयासह जिल्हा रूग्णालयातील रिक्तपदांचा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. उपलब्ध वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर रूग्णसेवेचा भार पडला असून, याचा परिणामही रूग्णसेवेवर झाल्याचे दिसून येते.जालना सामान्य रूग्णालयातील वर्ग एकची १२ तर इतर ठिकाणची ७ अशी एकूण १९ पदे रिक्त आहेत. वर्ग एकची अर्ध्याहून अधिक पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजाचे नियोजन करताना वरिष्ठांना तारेवरची कसरत करावी लागते. जिल्हा रूग्णालयातील वर्ग दोनची ३ पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागाचा भार असलेल्या ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयातील वर्ग दोनची टेंभुर्णी ग्रामीण रूग्णालयातील एक, घनसावंगी ग्रामीण रूग्णालयातील मंजूर ८ पैकी ५ व राजूर गणपती येथील वर्ग एकची २ पदे रिक्तआहेत.सामान्य रूग्णालयात वर्ग तीन ची १९३ पदे मंजूर आहेत. पैकी ४५ पदे रिक्त आहेत. तर नेत्रचिकित्सा अधिकारी, कुशल कारागीर, कार्यदेशक ही पदेही रिक्त आहेत. स्त्री रूग्णालयातील वर्ग तीनची ६ पदे रिक्त आहेत. अंबड उपल्हिा रूग्णालयातील ४, परतूर ग्रामीण रूग्णालयातील २, भोकरदन ग्रामीण रूग्णालयातील ४, जाफराबाद ग्रामीण रूग्णालयातील ५, टेंभुर्णी येथील ५, मंठा येथील ३, नेर २, घनसावंगी ३, राजूर ग्रामीण रूग्णालयातील ३ पदे रिक्त आहेत. याशिवाय वर्ग चारचीही अनेक पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला असून, ही रिक्तपदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.रूग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सुरू असलेल्या ट्रॉमा केअर युनिटलाही रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. मंठा येथील ट्रॉमा केअर युनिटमध्ये मंजूर ५ पैकी २ पदे रिक्त आहेत. घनसावंगी येथील युनिटमध्ये मंजूर ५ पैकी २ पदे रिक्त आहेत.जिल्हा क्षयरोग केंद्रही आजारीजिल्हा क्षयरोग केंद्रात १४ पदे मंजूर आहेत. पैकी ४ पदे रिक्त आहेत. विशेषत: वर्ग तीनच्या अधिपिरिचारिकेची तिन्ही पदे रिक्त असल्याने रूग्णसेवेवर परिणाम झाला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय