शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात ३४ टक्केच पशुगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:27 IST

मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पशुगणना करण्याचे काम पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती. परंतु, सध्या केवळ ३४ टक्केच पशूंची गणना झालेली आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पशुगणना करण्याचे काम पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती. परंतु, सध्या केवळ ३४ टक्केच पशूंची गणना झालेली आहे. दरम्यान, निवडणूक व तांत्रिक अडचणीमुळे पशुगणना संथगतीने सुरु असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पशुगणना करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. त्यानुसार कामही सुरु करण्यात आले. यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत डेडलाईन दिली होती.पशुगणना करण्यासाठी १०७ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे प्रगणक घरोघरी जाऊन जनावरांची माहिती गोळा करीत आहेत. ग्रामीण भागातील ३ लाख २० हजार ९०८ कुटुंबांपैकी १ लाख २४ हजार ४४५ कुटुंबांना प्रगणकांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. तर शहरी भागातील ७४ हजार ७१३ कुटुंबांपैकी १२ हजार ६४३ कुटुंबांची माहिती गोळा करण्यात आलेली आहे.दरम्यान, मार्च महिना संपत आला आहे. सरकारने दिलेली डेडलाईनही काही दिवसांतच संपणार आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील पशुगणना पुर्ण झालेली नाही. आतापर्यंत केवळ ३४ टक्केच पशूंची गणना करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण दुष्काळाचा कसा सामना करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.गणना बंद : कर्मचारी निवडणुकीच्या कामातलोकसभेच्या निवडणूका असल्यामुळे पशुसंवर्धन विभागातील अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. त्यामुळे सध्या तरी पशुगणना होत नसल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.इंटरनेट नसल्याने अडचणीपशुगणना ही आॅनलाईन झाली असून, यासाठी आॅनलाईन माहिती भरावी लागत आहे. परंतु, अनेक गावांमध्ये नेट चालत नसल्याने प्रगणकांना अडचणी येत आहे. त्यामुळे प्रगणकांना नाईलाजाने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन माहिती भरावी लागत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक