शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

जालना जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:48 IST

जवळपास पाच उपजिल्हाधिकाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेची राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून, या लोकशाहीच्या कुंभमेळाव्याची तयारी करताना जालना जिल्हा प्रशासनाची एका अर्थाने खरी परीक्षेची घडी आहे. जवळपास पाच उपजिल्हाधिकाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू असल्याचे चित्र आहे.जालना जिल्ह्यात अप्पर, निवासी, तसेच रोजगार हमी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्याने ही पदे रिक्त आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून वायाळ हे मंगळवारी रूजू होणार होते. तर रोजगार हमी योजनेला तब्बल सहा महिन्यांपासून उपजिल्हाधिकारी नाही. तर सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांची गंगाखेड येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे.विशेष म्हणजे निवडणूक उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या संगीता सानप यांच्याही बदलीची जोरदार चर्चा असून, मंत्रालय पातळीवरून या संदर्भात हालाचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडेंनी या संदर्भात विभागीय आयुक्तांकडे एक अहवाल पाठवला असून, त्या नंतर सानप यांच्या बदलीची जोरदार चर्चा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू होती.एकूणच निवडणुकीची तयारी करताना प्रशासनातील जे अधिकारी आहेत, त्यांच्यावर त्यांच्या विभागाची नियमितची कामे सांभाळून अतिरिक्त पदभार देण्यात आल्याचे दिसून आले. जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांच्याकडे अप्पर, निवासी तसेच अन्य एका विभागाचा अतिरिक्त पदभार आहे. आता आचारसंहितेचे पालन करण्यासाठी देखील स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जालना लोकसभा मतदार संघात एकूण २० ठिकाणी तपासणी नाके अर्थात चेकपोस्ट स्थापन करण्यात येणार आहेत. यंदा लोकसभेची उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांना इन्कमटॅक्सचे पाच वर्षातील रिटर्न द्यावे लागणार असून, पूर्वी केवळ तीन वर्षाचे रिटर्न द्यावे लागत होते.नवीन सुविधा : सोमवारपासून सीव्हीजी अ‍ॅपनिवडणूक काळात अनेक ठिकाणी आमिष दाखवण्याचे प्रकार घडत असतात. अशांवर आता सर्व सामान्य व्यक्ती देखील नजर ठेवू शकतो. एखाद्या व्यक्तीला कुठे काही चुकीचे होत असल्याचे निदर्शनास आल्यास तो सीव्हीजी या अ‍ॅपवर संबंधिताची तक्रार अथवा व्हिडिओही अपलोड करू शकतो. केलेल्या तक्रारींची प्रथम प्रशासनाकडून शहानिशा करण्यात येणार असून, तथ्य आढळलल्यास संबंधितांवर केवळ १०० मिनिटात कारवाई करण्यात येणार असून, या अ‍ॅपचे आज घडीला केवळ अधिकारी कर्मचाºयांसाठी असून, १८ मार्च पासून ते सर्वांसाठी खुले होणार आहे.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक