शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात वेडसर व्यक्तीने ६ कि़ मी. पळविला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 15:16 IST

पोलिसांनी दोन तासांनंतर घेतले ट्रकसह ताब्यात

ठळक मुद्दे१८ टायरचा ट्रक चोरी झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली टोलनाक्यावर घातली हुज्जत

जालना : शहरातील एका ट्रान्सपोर्टसमोर उभा असलेला ट्रक वेडसर व्यक्तीने जालना -औरंगाबाद या महामार्गावर पळविल्याने खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.    दोन तासांनंतर पोलिसांनी नागेवाडी येथून या वेडसर व्यक्तीला ट्रकसह ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोठा अनर्थ टळला.

१८ टायरचा ट्रक चोरी झाल्याची तक्रार कोहिनूर ट्रान्सपोर्टच्या मालकांनी फोनवर केली. कदिम पोलिसांनी तात्काळ सर्व पोलीस ठाण्यांना वायलेसवर माहिती देऊन शोध घेण्याचा सूचना केल्या. चंदनझिरा पोलिसांना औरंगाबाद रोडवर पेट्रोलिंग करीत असतांना एक इसम भरधाव वेगाने वेडी-वाकडी वळण घेत ट्रक चालवत औरंगाबादच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. नागेवाडी इंजिनिरीग कॉलेजजवळ तो ट्रक रोडच्या बाजूला फसलेला पोलिसांना दिसून आला. सदर इसम तो काढण्यासाठी जोराने रेस करताना आढळल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर तो वेडसर असल्याचे त्यांनी सांगितले.  या घटनेत पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

टोलनाक्यावर हुज्जतसदर व्यक्ती ही ट्रक घेऊन औरंगाबादकडे जात होती.   चंदनझिरा परिसरातील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोल  फाडण्याचे सांगितल, परंतु, त्या व्यक्तीकडे पैसे नसल्याने त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी तासभर हुज्जत घातली.  

टॅग्स :PoliceपोलिसJalanaजालनाArrestअटक