शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहराचा सांडपाणी प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:41 IST

केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून कंत्राटदार मिळत नसल्याने रखडला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ५५ कोटी रूपयांची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा चौथ्यांदा प्रसिद्ध केल्यानंतर एका कंत्राटदाराने ती भरली. असे असताना जालना पालिकेकडे जी अनामत रक्कम भरणे आवश्यक असते, ती न भरल्याने नव्याने निविदा काढण्याबाबत पालिका विचार करत असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देकंत्राटदार मिळेना : पाचव्यांदा निविदा काढणार

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून कंत्राटदार मिळत नसल्याने रखडला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ५५ कोटी रूपयांची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा चौथ्यांदा प्रसिद्ध केल्यानंतर एका कंत्राटदाराने ती भरली. असे असताना जालना पालिकेकडे जी अनामत रक्कम भरणे आवश्यक असते, ती न भरल्याने नव्याने निविदा काढण्याबाबत पालिका विचार करत असल्याचे सांगण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रत्येक महापालिका तसेच पालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात सांडपाण्याचा पुनर्वापर प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून यासाठी जालना जिल्ह्याला एकूण प्रकल्पासाठी २६० कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहेत. परंतु एकाचवेळी हा प्रकल्प पूर्ण करणे शक्य नसल्याने त्यासाठी दोन किंवा तीन टप्पे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या सुचनेनुसार जीवन प्राधिकरण विभागाकडून त्याचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. त्यानुसार जालना शहरातील कुंडलिका आणि सीना नदीला मिळणाऱ्या सर्व नाल्यांचे पाणी एकत्रित करून ते एका दोन पाईपलाईनव्दारे रोहनवाडी येथील पूलाजवळ नेऊन तेथे सांडपाणी स्वच्छ करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हे स्वच्छ झालेले पाणी पुन्हा शेतीसह काही उद्योगांना देण्याचा विचार आहे. यामुळे शहरातील नदी स्वच्छ होऊन पाण्याचा पुनर्वापर करणे सोयीचे ठरणार आहे.प्रकल्प : शेती उद्योगासाठी पर्वणी ठरणारसांडपाण्याचा पुनर्वापर प्रकल्प जालन्यात कार्यान्वित झाल्यास त्याचा खºया अर्थाने येथील विविध उद्योगांना होणार आहे. स्वच्छ केलेले पाणी उद्योगांसाठी उपयोगात येऊ शकते तर काही ठिकाणी या प्रकल्पापासून शेतकºयांना पाईपलाईन टाकण्याची मुभाही देण्यात येणार आहे. एकूणच हा प्रकल्प शेती आणि उद्योगासाठी पर्वणी ठरू शकतो.एकूणच जालन्यातील भूमिगत गटार योजना अद्यापही म्हणजेच तब्बल १९ वर्षापासून रखडलेली आहे. त्यामुळे या सांडपाणी प्रकल्पाचे तसे होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. चारवेळेस निविदा काढूनही किचकट निकषांमुळे कंत्राटदार पुढे येत नसल्याने आता पालिका प्रशसन नव्याने ही प्रक्रिया करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषद