शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

जालन्यात आघाडीसमोर युतीचे कडवे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 06:04 IST

एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या जालना जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीने मोेठे आव्हान निर्माण केले आहे.

- संजय देशमुख जालना : एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या जालना जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीने मोेठे आव्हान निर्माण केले आहे. आज घडीला काँग्रेसचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे हे एकमेव आमदार आहेत. दुसरीकडे भाजपचे तीन आणि शिवसेनेचा एक आमदार आहेत. पैकी बबनराव लोणीकर (भाजप) आणि अर्जुन खोतकर (शिवसेना) हे मंत्री आहेत.पाच विधानसभा मतदारसंघांत भोकरदनमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आमदार असून, परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर हे विजयी झाले आहेत. बदनापूर या राखीव मतदारसंघातून आ. नारायण कुचे हे नेतृत्व करत आहेत. २०१४ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला. जालना विधानसभा वगळता त्यांना कुठेच यश मिळाले नाही. त्यातही अर्जुन खोतकर हे केवळ २९६ मतांनी विजयी झाले होते.यंदा मात्र, चित्र वेगळे राहणार आहे. भाजप-शिवसेनेची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. भाजपकडील बदनापूर मतदारसंघ पुन्हा शिवसेनेला मिळावा म्हणून अर्जुन खोतकर तसेच माजी आ. संतोष सांबरे मातोश्रीवर आतापासून संपर्क ठेवून आहेत. तर भाजप हा त्यांच्या विद्यमान आमदाराचा मतदारसंघ सेनेला एवढ्या सहजासहजी सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे या जागेवरून युतीत मतभेद होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे घनसावंगी मतदारसंघातून यंदा शिवसेनेकडून प्रशासकीय सेवेत राहिलेले आणि आता बांधकाम व्यवसासायिक असलेले टोपे यांचे परंपरागत विरोधक हिकमत उढाण हे शड्डू ठोकून आहेत. त्यामुळे घनसावंगी मतदारसंघातही मोठी चुरस निर्माण होणार आहे. राजेश टोपे यांचे वडील आणि माजी खासदार अंकुशराव टोपे यांचे २०१५ मध्ये निधन झाले. त्यांची मोठी पकड अंबड आणि घनसांगी मतदारसंघात होती. आता ते नसल्याने टोपे यांना निवडून येण्यासाठी अधिकचे परिश्रम घ्यावे लागतील.जालना तसेच परतूर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. लोणीकरांना परतूर मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांचे तगडे आव्हान असून, खोतकरांना काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल चांगली टक्कर देतील. गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता जालनाच्या नगराध्यक्षा असून, पालिकेत सत्ताही काँगे्रसची सत्ता आहे.

भोकरदन विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटलेला असून, तेथे माजी आ. चंद्रकांत दानवे हे दोन वेळेस निवडून आले होते. तेच यंदा पुन्हा रिंगणात राहतील. त्यामुळे या मतदारसंघात दानवे विरूद्ध दानवे अशी लढत होणार आहे.>पक्षीय बलाबलभाजप ०३ । शिवसेना ०१राष्ट्रवादी ०१ । एकूण जागा-५>सर्वात मोठा विजय घनसावंगी राजेश टोपे (राष्ट्रवादी) ९८ हजार ३०(पराभूत- विलास खरात, भाजपा)>सर्वात कमी मताधिक्याने पराभव जालना- कैलास गोरंट्याल (काँगे्रस- मते २९६)(विजयी- अर्जुन खोतकर, शिवसेना,)>वंचितची धास्ती कायमबहुजन वंचित आघाडी काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. अनेकजण वंचित आघाडीकडून रिंगणात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे प्रस्थापितांचे वंचित आघाडीकडे चातक पक्ष्याप्रमाणे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकर