शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जालना :  ‘त्या’ आॅडिओ क्लिपची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:21 IST

अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक सोडण्याच्या कारणावरून अंबड पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिका-यांने उपनिरीक्षकावर टाकलेल्या दबावाच्या वादग्रस्त संवादाची आॅडिओ क्लिप व्हॉयरल झाली आहे. याची पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी गंभीर दखल घेतली असून, अप्पर अधीक्षकांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचे आदेश : वाळूचा ट्रक सोडविण्यासाठी दोन अधिका-यांमधील संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक सोडण्याच्या कारणावरून अंबड पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिका-यांने उपनिरीक्षकावर टाकलेल्या दबावाच्या वादग्रस्त संवादाची आॅडिओ क्लिप व्हॉयरल झाली आहे. याची पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी गंभीर दखल घेतली असून, अप्पर अधीक्षकांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.अंबड पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रक पकडला होता. ठाणे डायरीत खाडाखोड करून पकडलेला ट्रक रात्रीतून सोडून देण्यात आला. त्यानंतर शनिवारी अंबड ठाण्याचे पोलीस निरीक्षक व ट्रक पकडणारे उपनिरीक्षक यांच्यात झालेल्या संवादाची आॅडिओ किल्प व्हॉयरल झली आहे. कुठलीही कारवाई न करता हा पडकडलेला ट्रक तात्काळ सोडून देण्यासाठी ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी उपनिरीक्षकांशी फोनवर संपर्क केला. तुम्ही माझ्यापेक्षा कनिष्ठ आहात. नोकरीत दोनच वर्ष झाले. मला शिकवू नका, ती मीटरमधील गाडी आहे.वाळूचा ट्रक तात्काळ सोडून द्या, तुम्हाला पैसे हवेत का, किती पैसे हवेत, अशा प्रकारच्या संवादाची आॅडिओ किल्प वेगवेगळ्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हॉयरल झाली आहे. यामुळे पोलीस दलाच्या कारभाराबाबत चर्चा सुरू झाल्याने पोलीस अधीक्षक पोकळे यांनी रविवारी अप्पर अधीक्षक लता फड यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.अवैध वाळू वाहतूक : यापूर्वीही झाली होती तक्रारकाही महिन्यांपूर्वी भोकरदनच्या तहसीलदारांनी पोलीस अधिकारी वाहू माफियांवरील कारवाईस सहकार्य करत नसल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकाºयांकडे केली होती.या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिले होते. मात्र, पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे आॅडिओ क्लिप संवादाच्या चौकशीचे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.तर फॉरेन्सिक तपासणीअप्पर पोलीस अधीक्षक फड यांना विचारले असता, सदर प्रकरणाची चौकशी करताना दोन्ही अधिकाºयांचे जबाब नोंदविले जाईल. त्यांनी आॅडिओ क्लिपमधील संवाद या अधिकाºयांचाच आहे का हे तपासले जाईल. अधिकाºयांनी याबाबत कबुली न दिल्यास संवादाची क्लिप फॉरेन्सिक तपासणीकरिता पाठवली जाईल, असे त्यांनी सांगितले.