शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील आपचा उमेदवार चर्चेत, बाँडपेपरवर दिला जाहीरनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 19:27 IST

सुशिक्षित बेरोजगार आम आदमी पक्षाचे उमेदवार संतोष मगर यांनी 100 रुपयांच्या बॉण्डवर आगळावेगळा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला.

परतूरः जालना जिल्ह्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात सुशिक्षित बेरोजगार आम आदमी पक्षाचे उमेदवार संतोष मगर यांनी 100 रुपयांच्या बॉण्डवर आगळावेगळा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे. निवडणुकीत अनेक उमेदवार जनतेला खोटी आश्वासने देऊन निवडून येतात व निवडून आल्यानंतर दिलेली वचने विसरतात.तसेच मतदारसुद्धा उमेदवार यांनी दिलेली आश्वासने विसरून जातात. पण परतूर मंठामधून मी आम आदमी पार्टीचा उमेदवार संतोषकुमार आनंदा मगर निवडणूक लढवत आहे. माझा निवडणूक जाहीरनामा बॉण्डवर नोटरी करून जनतेला देत आहे, जर ते पूर्ण न केल्यास मी जनतेला माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार देत आहे. अशा जाहीरनाम्यामुळे आम आदमी पक्षाचे नेते उमेदवार संतोष मगर चर्चेत आले आहेत.  तसेच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास नागरिकांना याेग्य ती कारवाई करण्याचा अधिकार देखील त्यांनी मतदारांना दिला आहे. विधानसभेच्या निवडणुका येत्या 21 ऑक्टाेबर राेजी हाेत आहेत. त्यासाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.निवडणुकीच्या वेळी विविध राजकीय पक्ष तसेच उमेदवार मतदारांना माेठमाेठी आश्वासने देत असतात. परंतु अनेकदा ती आश्वासने निवडणुकांपूर्तीच मर्यादित राहतात. निवडणुका झाल्यावर त्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे नेते केवळ आश्वासने देतात परंतु त्याची पूर्तता करत नाहीत, असा समज मतदारांमध्ये झालेला असताे. हा समज खाेडून काढण्यासाठी मगर यांनी थेट आपला जाहीरनामा शपथपत्रावर लिहून दिला आहे. या जाहीरनाम्यात त्यांनी विविध 11 आश्वासने दिली आहेत. निवडून आल्यावर ती पूर्ण न केल्यास फसवणूक केल्याची कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार त्यांनी मतदारांना दिला आहे. 

 

याबाबत लाेकमतशी बाेलताना मगर म्हणाले, बऱ्याच लाेकांकडून ऐकले हाेते की उमेदवार आश्वासने देतात परंतु ती पूर्ण करत नाहीत. मतदारांचा देखील तसा समज झालेला असताे. एखाद्या उमेदवाराने प्रामाणिक भावनेतून आश्वासने दिली असतील तर त्याने ती मतदारांना लिहून देण्यास काहीही हरकत नाही. मी दिलेली आश्वासने निवडूण आल्यास मी शंभर टक्के पूर्ण करणार आहे. अन्यथा मतदारांना माझ्यावर फसवणुकीची कारवाई करण्याचा अधिकार मी दिला आहे. 

टॅग्स :partur-acपरतूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019