शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
3
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
4
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
5
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
7
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
8
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
9
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
10
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
11
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
12
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
13
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
14
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
15
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
16
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
17
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
18
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
19
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
20
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात 'मविआ'चा जल्लोष; मतमोजणी केंद्राबाहेरून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा काढता पाय

By विजय मुंडे  | Updated: June 4, 2024 18:08 IST

Jalana Lok Sabha Result 2024: कॉँग्रेसच्या डॉ. कल्याण काळेंना ५४ हजारांची लिड मिळाली 

Jalana Lok Sabha Result 2024: जालना लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीतील १७ व्या फेरीअखेर मविआचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना ४ लाख १० हजार ५८० मते मिळाली आहेत. तर महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना ३ लाख ५६ हजार २२० मते मिळाली आहेत. डॉ. काळे यांना ५४ हजार ५३८ मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे मविआच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष सुरू केला असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र परिसरातून काढता पाय घेतला होता.

जालना लोकसभा मतदार संघाची मतमोजणी मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. मतमोजणी अत्यंत कासवगतीने होत असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांनाही फेरीनिहाय निकालासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत होती. पहिल्या तीन-चार फेरींमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. कल्याण काळे यांना समसमान मते मिळत होती. परंतु, पाचव्या फेरीनंतर मविआचे डॉ. कल्याण काळे यांनी घेतलेली आघाडी १६ व्या फेरीपर्यंत कायम होती. १७ व्या फेरीअखेर डॉ. काळे यांना ४ लाख १० हजार ५८० मते मिळाली होती. तर दानवे यांना ३ लाख ५६ हजार २२० मते मिळाली होती. काळे यांनी ५४ हजार ५३८ मतांची आघाडी घेतल्यानंतरच काँग्रेस कार्यकर्त्यांसह मविआच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरू केला.

साबळेंनी घेतली एक लाख मतेअपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी १७ व्या फेरीअखेर तब्बल १ लाख १४ हजार ८४७ मते घेतली होती. वंचितचे उमेदवार प्रभाकर बकले यांनी २४ हजार २०० मते घेतली होती. अपक्ष उमेदवार साबळे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेत प्रमुख उमेदवारांनाही धक्का दिला आहे.

टॅग्स :jalna-pcजालनाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४