शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जाहलो खरेच धन्य... मराठीलाही कॉपी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:29 IST

मराठी ही आपली मातृभाषा आहे. असे असतांना मराठीच्या पेपरलाही कॉप्या करण्याचे प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देजालना येथील प्रकार : अर्ध्यातासात प्रश्नपत्रिका व्हायरल, १० कॉपी बहादरांवर कारवाई, दोन तोतयावर गुन्हे दाखल

जालना : मराठी ही आपली मातृभाषा आहे. असे असतांना मराठीच्या पेपरलाही कॉप्या करण्याचे प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे प्रश्नपत्रिकेमध्ये सारांश दिलेला असतो तो वाचुनच विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यासासठीही विद्यार्थ्यांकडून मराठीच्या पेपरला कॉपी करण्याचे प्रकार उघड झाल्याने जाहलो खरेच धन्य... मराठीलाही कॉपी असे म्हणण्या वाचून पर्याय राहिलेला नाही.दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून यंदा बोर्डाने अधिकची खबरदारी घेतली आहे. असे असतांनाही शुक्रवारी मराठीच्यापरीक्षेला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात कॉपी केल्याचे समोर आले आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंठा तालुक्यातील दोन विद्यालयातील चक्क १० विद्यार्थी कॉपी करताना पकडल्याने खळबळ उडाली आहे. मंठा तालुक्यातीलच दहिफळ खंदारे गावात मराठीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने देखील एकच खळबळ उडाली.दहावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी करण्याचे प्रकार सुरू आहेत. कितीही सूचना दिल्यावरही विद्यार्थी मोठ्या चालाकिने कॉपी सोबत आणत असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. प्रारंभी परीक्षा केंद्रावर येतानाच विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्याचे निर्देश आहेत. अशाही स्थितीत विद्यार्थी शक्कल लढवून कॉपी परीक्षा केंद्रात आणत आहेत. शुक्रवारी मंठा तालुक्यातील रेणुकादेवी विद्या मंदिर शाळेत भरारी पथकाने अचानक भेट दिली. भरारी पथक आल्याचे कळल्यावर विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर आठ विद्यार्थी कॉपी करतांना पकडले.तसेच मंठा तालुक्यातीलच छत्रपती संभाजी विद्यालयातील दोन विद्यार्थी कॉपी करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी दहा विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. बोर्ड कॉपी मुक्त परीक्षेचा दावा करत असतांनाच मराठीच्याच पेपरला कॉप्या सुरु आहे.जालना जिल्ह्यात ३१ हजार विद्यार्थी देतायत परीक्षादहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. जालना जिल्ह्यात यंदा परीक्षेसाठी जवळपास ३१ हजार ५७२ विद्यार्थी बसले आहेत. परीक्षा केंद्रावर सुविधा देण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली. कॉपी मुक्तीसाठी सहा भरारी पथकासह बैठे पथकही तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :JalanaजालनाStudentविद्यार्थीexamपरीक्षा