शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानेच मज तप फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:15 IST

मी आणि माझे महाविद्यालयीन मित्र राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेशी निष्ठा ठेवल्यानेच आमचा येथपर्यंतचा प्रवास सुफळ झाला आहे असे भास्कर अंबेकर म्हणाले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्ककुठल्याही कामामध्ये निष्ठा, समर्पण भाव आणि लोकहित लक्षात घेतल्यास त्यातून मिळणारा आनंद आणि पक्षनिष्ठेचे फळ म्हणजेच माझी ही गोदावरी विकास खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदावरील निवड होय. पूर्वी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९८८ मध्ये शिवसेनेशी नाळ जुळली. ती आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून घट्ट बनली आहे. मी आणि माझे महाविद्यालयीन मित्र राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेशी निष्ठा ठेवल्यानेच आमचा येथपर्यंतचा प्रवास सुफळ झाला आहे असे भास्कर अंबेकर म्हणाले. त्यांची ही मुलाखतप्राधान्य कोणत्या बाबींना द्याल ?मराठवाड्यातील जालना जिल्हा हा कायमस्वरूपी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजही सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. कागदोपत्री सिंचनाचा अनुशेष पूर्ण झाल्याचे दर्शविले जात असले तरी वास्तव तसे नाही. त्यामुळे सिंचनाच्या अनुशेषाचा अभ्यास करून बापकळ, बरबडा यासह अन्य सिंचन प्रकल्प मार्गी लावून शेती आणि पिण्याला पाणी उपलब्ध करून देण्याला आपले प्राधान्य राहणार आहे.या संधीकडे आपण कसे पाहता ?पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला ही महत्त्वाची जबाबदारी लाभली आहे. २००१ ते २००६ या काळात आपण जनतेतून नगराध्यक्ष झालो होतो. तेव्हांही अनेक लोकोपयोगी कामे केली. येथेही हेच धोरण राहणार आहे.घरातील राजकीय वारसा नसताना केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांनी प्रेरित होऊन आपण राजकारणात प्रवेश केला. कधी यश तर कधी अपयश आले म्हणून पक्षाशी निष्ठा सोडली नाही. अनेक प्रलोभने आली परंतु निष्ठा न ढळू दिल्यानेच राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे पद मिळालेअनेक प्रकल्प अपूर्णसिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी वॉटरग्रीड योजना प्रस्तावित आहे. तिचे आपण स्वागतच करत असून, असे असले तरी जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे. पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा मुद्दा मार्गी लावू .आपण महाबीजचे संचालक असताना देखील जालन्यात प्रक्रिया उद्योग सुरू केला होता.

टॅग्स :godavariगोदावरीShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प