शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘आयपीएल’वर सट्टा, आठ ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:12 IST

जालना व मंठा शहरातील हॉटेलल्समध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आठ संशतियांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघादरम्यान रविवारी रात्री सुरू असलेल्या सामन्या दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी महागडे मोबाईल्स, एलसीडी टीव्ही व रोख सव्वा दोन लाख रुपये जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना व मंठा शहरातील हॉटेलल्समध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आठ संशतियांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघादरम्यान रविवारी रात्री सुरू असलेल्या सामन्या दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी महागडे मोबाईल्स, एलसीडी टीव्ही व रोख सव्वा दोन लाख रुपये जप्त केले.शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे सदर बाजार पोलिसांनी रात्री उशिरा सदर छापा टाकला. तेंव्हा काहीजण टीव्हीसमोर राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स या संघादरम्यान सुरू सामन्यांवर सट्टा लावताना आढळून आले. पोलिसांनी संशयित अमित हिरालाल रठ्ठैय्या (२७, रा. कपडाबाजार), विनोद दादुराव रठैय्या ( ४२, रा. आदित्य कॉम्पलेक्स), शेख नजीर शेख इब्राहीम (४३ रा. खडकपुरा), रुपेश गणेश घोडके ( ३२, रा. लालबाग) यांना ताब्यात घेतले. यातील हिरालाल रठैय्या व अन्य एक मुख्य बुकींसोबत मोबाईलवर संपर्क करून, तसेच टेलिग्रॉत अ‍ॅपवर आॅनलाइन लिंक तयार करून सट्टा लावत होते. मुख्य बुकी संशयित सोनू चौधरी, विनोद भगत, सुरज काबलिये हे फरार झाले. कारवाईत पोलिसांनी महागडे मोबाईल्स, एलसीडी टीव्हीसह रोख एक लाख ७४ हजार ३५० जप्त केले. या प्रकरणी सदर बाजार ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, विशेष कृती दलाचे यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक महादेव राऊत, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख, शिवाजी जमधडे, मनोज काळे, कैलास खार्डे, संदीप बोंद्रे, संतोष पवार, सुधीर वाघमारे, फुलचंद गव्हाणे, किरण चेके, देविदास भोजणे, श्रीकुमार आडेप यांनी ही कारवाई केली.मुद्देमाल जप्त : मंठ्यातही चौघांना अटकमंठ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी रविवारी रात्री पथकासह शहरातील एका हॉटेलमध्ये छापा आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाºया चार संशयित बुकिंना ताब्यात घेतले. अमोल गणेशराव मोरे (रा. देवठाणा), भागवत रामदास कव्हळे (रा. वांजूळा) दीपक रामेश्वर तोडकर (रा. तुकारामनगर) व दीपक महादेवराव बोराडे (रा. बोराडेगल्ली, मंठा), अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सात मोबाईल्स, एलसीडी टीव्ही व रोख ५० हजार रुपये जप्त केले आहे.

टॅग्स :IPL 2018आयपीएल 2018Crimeगुन्हा