शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सीईओ विनयभंग प्रकरणाचा तपास अधिकारी बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:24 IST

सीईओ दीपक चौधरी यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील महिला अधिका-याचा विनयभंग केल्याप्रकरणाचा तपास अधिकारी अचानक बदलण्यात आल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सीईओ दीपक चौधरी यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील महिला अधिका-याचा विनयभंग केल्याप्रकरणाचा तपास अधिकारी अचानक बदलण्यात आल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.काही दिवसांपूर्वी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील महिला अधिका-याचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ दीपक चौधरी यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील विविध महिला संघटना आणि सामाजिक संघटनांनी निदर्शने करुन सीईओंच्या निलंबनाची मागणी केली.पोलिसांवर दडपण वाढल्याने सीईओ चौधरी पोलीस ठाण्यात हजर झाले. नंतर त्यांना तात्काळ जामीन मिळाला. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असतानाच पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्याकडून याचा तपास काढून घेण्यात आला. या प्रकरणाचा तपास महिला तक्रार निवारण केंद्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली येमपुरे यांच्याकडे सोपविण्यात आला. याबाबत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार म्हणाले की, उपनिरीक्षक जाधव यांच्याकडून साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने तपास काढून घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सीईओ बराच वेळ जिल्हा परिषदेतविनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीईओ दीपक चौधरी यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. मुंबईत ते रुजू झाले असले तरी मंगळवारी जालन्यात आले होते. जिल्हा परिषदेत बराच वेळ काही अधिका-यांसमेवत त्यांनी काही महत्त्वाच्या विषयांववर चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते. यासंदर्भात जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चौधरी यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. काही राहिलेली कागदपत्रे घेण्यासाठी ते जिल्हा परिषदेत आले असतील. इतर काही कारण असेल ते आपण सांगू शकणार नाही. तरीही याची सविस्तर माहिती घेण्यात येईल.फड यांच्या निगराणीखाली तपासवरिष्ठ महिला अधिका-याकडून तपास व्हावा, अशी जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटनांची मागणी होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पदावरील महिला अधिका-याकडे देण्यात आला आहे. तरीही अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या निगराणीखाली या प्रकरणाचा तपास केला जाईल.- रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक, जालना