शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कर आकारणीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:49 IST

जालना शहरातील वाढीव कर आकारणीच्या मुद्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील वाढीव कर आकारणीच्या मुद्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. याचवेळी त्यांनी गणेश विसर्जन मिरणूक तसेच रेल्वेस्थानक जवळील रेल्वे गेटजवळ भूयारी मार्ग उभारण्याचे निर्देशही खोतकरांनी रेल्वेच्या नांदेड येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.एकूणच खोतकरांनी जालन्यातील कोंडवाडे गायब होण्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करताना प्राणी संरक्षण कायद्याच्या चौकटीत राहून कारवाईचे निर्देश मुख्याधिका-यांना दिले. ग्रामीण भागातील माकडांचा बंदोबस्त ज्या प्रमाणे करण्यात आला होता, त्याच धर्तीवर शहरातील मोकाट कुत्र्यांवर तसा प्रयोग करता येईल काय, या बद्दल प्रशासनाने विचार करण्याचे सांगितले. जालन्यातील पािलकेच्या हद्दीतील रस्त्यांचा मुद्दही गंभीर असल्याचे ते म्हणाले. आम्ही आमच्या निधीतून नवीन रस्ते केले म्हणून तरी आज शहराची अवस्था बरी असल्याचा दावा त्यांनी केला.जालना पालिकेने गेल्या वर्षी नवीन कर आकारणीसाठी ज्या खाजगी एजन्सीला काम दिले होते. ते मुळात चुकीचे असून, हे काम करण्यासाठी पालिकेत स्वतंत्र यंत्रणा असतांना खासगी एजन्सीचा हट्ट हा धरला असा सवालही त्यांनी केला. अंदाज समितीच्या अहवालावर लवकरच कारवाई होणार असून, सध्या पालिकेची जी चौकशी सुरू आहे, त्यातूनही अनेक गंभीर मुद्दे पुढे येणार आहेत. यातून सत्ताधाºयांना चांगलाच घाम फुटेल असे ते म्हणाले.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, रेल्वे संघर्षचे गणेशलाल चौधरी, फेरोज अली हजर होते.भुयारी मार्गाचे काम आठ दिवसांत करारेल्वे स्थानकाजवळील विद्युतनगरसह अन्य भागात जाणाºया रेल्वे गेटवर भुयारी रेल्वे मार्ग करण्यासाठी निधीची मंजुरी आहे. परंतु येथून जाणाºया पाण्याची विल्हेवाट कशी लावावी कशी, हा प्रश्न अनुत्तरित होता.त्यावर पर्याय म्हणून परतूर येथील पुलाच्या धर्तीवर येथेही स्वतंत्र हौद बांधून त्यातून विद्युत मोटार लावून ते उपसण्यासाठी सौर उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. या संदर्भात रेल्वेच्या विभागीय अधिका-यांना मोबाईलवरून संपर्क केला. त्यावेळी हे काम आठवडाभरात सुरू केले जाईल.राऊत यांनी केली याचिका दाखलजालना शहरातील कर आकारणी करताना खासगी एजन्सीकडून हे काम करून घेताना पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत या कंपनीला ७० लाख रूपयांचे बिल अदा केले आहे. दरम्यान पालिकेने ही खाजगी एजन्सीकडून हे काम करून घेऊ नये, असे निर्देश नागपूर येथील उच्च न्यायालय खंडपीठाचे आहेत. असे असताना देखील जालना पालिकेने याकडे दुर्लक्ष केले.यामुळे जालना शहरातील नागरिकांवर थेट साडेचार कोटी रूपयांवरून २४ कोटी रूपयांवर पोहोचला आहे. यावर आक्षेप दाखल करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि कुठलेही राजकारण या मुद्यात न आणता आपण औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठात कर आकारणी विरोधात याचिका दाखल केल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणी नगरसेविका संध्या देठे यांनीही तक्रार केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदArjun Khotkarअर्जुन खोतकरcivic issueनागरी समस्याTaxकर