शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्या इंदोरमध्ये केले जेरबंद; जालना पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 12:46 IST

Robbery Crime News दिवसा घरफोडी करणाऱ्या कुख्यात टोळीवर राज्यातील पाच पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत

ठळक मुद्देविशेष पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी इंदोर व परिसरात पंधरा दिवसांचा मुक्काम केला.आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह जालना जिल्ह्यात तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, बीड, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक येथे घरफोड्या केल्याची कबुली

जालना : राज्याच्या विविध भागांत दिवसा घरफोडी करून लाखोचा ऐवज लंपास करणाऱ्या मध्य प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला जालना गुन्हे शाखेने इंदोर येथून जेरबंद केले आहे. ही कारवाई १३ फेब्रुवारी रोजी केली असून, त्याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली.

जालना शहरातील गोपीकिशननगर भागातील घरफोडी प्रकरणातील आरोपींचा शोध जालना गुन्हे शाखेचे पथक घेत होते. या चोरीमध्ये मध्य प्रदेशातील इंदोर येथील आरोपींचा हात असल्याची माहिती पो.नि. भुजंग यांना मिळाली होती. त्या माहितीनुसार पो.नि. भुजंग, पो.उपनि. दुर्गेश राजपूत यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम संबंधित आरोपींचा शोध घेत होत्या. तपासात पवन उर्फ भुरा रामदास आर्या (रा.इंदोर, मध्य प्रदेश) याचे नाव समोर आले होते. आर्या व त्याच्या सहकाऱ्यांनी जळगाव, बुलडाणा, जालना, बीड, सांगली, कोल्हापूर, धारवाडा आदी ठिकाणी अशा चोऱ्या केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोर येथे धाव घेऊन आरोपी पवन उर्फ भुरा रामदास आर्या याला जेरबंद केले. त्याच्याकडून कारसह जवळपास १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१५ दिवसांचा मुक्कामविशेष पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी इंदोर व परिसरात पंधरा दिवसांचा मुक्काम केला. मिळालेली माहिती व आर्थिक विश्लेषण करून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह जालना जिल्ह्यात तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, बीड, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली.

२१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीआरोपी पवन उर्फ भुरा रामदास आर्या याला शनिवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याच्याकडून १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRobberyचोरीJalanaजालना