झिरपी येथे निधी संकलनासाठी यात्रा
अंबड : तालुक्यातील झिरपी येथे गुरूवारी श्रीराम मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर निधी संकलन यात्रा काढण्यात आली. यावेळी गुलाब राठोड, डॉ. राजेंद्र भाला, केदार मंत्री, विष्णू सोनवणे, शरद भवर, श्याम राऊत, शरद माळोदे, अनिल चव्हाण, नितेश चव्हाण, मारूती झाटे, शेख बशीर, परमेश्वर पालेकर, रामेश्वर हामणे, मारूती हामणे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांसाठी महिलांनी दिल्या आसन पट्ट्या
जालना : शहरातील भाग्यनगर भागातील सखी ग्रुपच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एकमेकींना वान न देता सुरेखा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आसन पट्ट्या भेट देण्यात आल्या. यावेळी वर्षा सहानी, कविता सहानी, उषा देशपांडे, अनिता सहानी, सविता कुलकर्णी, रेखा मोरे, प्रियंका खेरूडकर प्रांजली मापारी यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांची तपासणी करून शाळेत प्रवेश
जामखेड : येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवी ते आठवीचे वर्ग भरण्यास सुरूवात झाली आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना वर्गात प्रवेश दिला जात आहे. यासाठी मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड, सहशिक्षक एस. के. शिंदे, अमित सातपुते यांच्यासह शालेय समितीचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.