शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

‘युरिन डिस्पोजल बॅग’ची आंतरराष्ट्रीय दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:14 IST

जालन्यातील सिध्दांत सतीश तवरावाला या युवकाने यावर पर्याय शोधला असून, सहज कोणालाही वापरता येईल अशी युरिन डिस्पोजल बँगचे संशोधन केले आहे. त्याच्या या इनोव्हेशनची दखल लंडन येथील न्यूटन फाऊंडेशनने घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एखाद्या आजाराने रूग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच भटकंती करणाऱ्यांना अडोशाची जागा शोधताना अनेकवेळा अडचण येते. परंतु यावर जालन्यातील सिध्दांत सतीश तवरावाला या युवकाने यावर पर्याय शोधला असून, सहज कोणालाही वापरता येईल अशी युरिन डिस्पोजल बँगचे संशोधन केले आहे. त्याच्या या इनोव्हेशनची दखल लंडन येथील न्यूटन फाऊंडेशनने घेतली असून, त्याच्या प्रयोगाचे सादरीकरण तसेच त्यात आणखी सुधारणा कशा करता येतील यावर पुढील महिन्यात तो लंडनला १५ दिवसांसाठी जाणार आहे.या संदर्भात सिध्दांत तवरावालाने सांगितले की, आपण मुंबईतील नरसी मोहनजी अभियांत्रिकी महाविद्यालयातून मॅकेनिकल इंजिनिअरची पदवी घेतली. त्यानंतर अहमदाबाद येथे एमबीएची पदवी घेतली. एमबीएची पदवी घेत असतानाच त्यांना नवीन संशोधन प्रकल्प द्यायचा होता. सिध्दातंने या प्रकल्पासाठी स्वच्छ भारत मिशन अभियाना अंतर्गत शौचालयांचा अभाव अडसर ठरत असल्याचे टिपले आणि युरिन डिस्पोजल विषयावर काम सुरू केले. त्यासाठी त्याला दिल्लतील अमेरिकन दूतावासाची तसेच टेक्सास विद्यापीठातील तीन प्रोफेसरची मोठी मदत झाल्यानेच हे शक्य झाल्याचे सिध्दांतने सांगितले.यासाठी त्याला केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाकडून १५ लाख रूपयांचे अर्थसाह्य मिळाले आहे.विशेष म्हणजे ही युरिन डिस्पोजल बॅग प्रवासाठीच्या वापरण्यात येणा-या बॅगमध्ये ठेवल्यावरही त्यांची दुर्गंधी येत नसल्याचा दावा सिध्दार्थने केला आहे. या बँगमध्ये आणखी कोणते संशोधन करता येईल यावर आता पुढील महिन्यात न्यूटन फाऊंडेशनमध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. जालन्यातील सिध्दांत प्रमाणे भारतातून अन्य चार युवकांच्या संशोधनाचीही निवड न्यूटन फाऊंडेशनने केली असल्याचे सिध्दांर्थ म्हणाला.या युरिन डिस्पोजल बॅगचे ख-या अर्थाने उत्पादन हे लंडन येथून परतल्यावर अधिक चांगल्या पध्दतीने करण्यात येणार असल्याचे सिध्दांतने सांगितले.संशोधन काळात त्याने सतत दीड वर्ष या युरिन डिस्पोजल प्रकल्पावर काम केले. त्यानंतर तयार केलेली ही बॅग एका विशिष्ट पेपर पासून तयार केली आहे. या बॅगमध्ये युरिन जमा झाल्यावर रासायनिक प्रक्रिया होऊन ती टूथपेस्ट प्रमाणे घनरूप होते. त्यामुळे ही बॅग प्रवासह रूग्णांसाठी वरदान ठरू शकते.

टॅग्स :scienceविज्ञानLondonलंडनJalanaजालना