शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलात खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:59 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या केल्या आहेत. यात कदीम पोलीस ठाण्याचा पदभार पोनि डी.के.शेळके यांच्याकडे तर तालुका जालना ठाण्याची सूत्रे पोनि एस.एच.गंदम यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. तर पोलीस अधीक्षकांचे वाचक सपोनि एस.डी.पायघन यांची टेंभुर्णी ठाण्यात बदली झाली आहे.बाहेरील जिल्ह्यातून बदलून आलेले पोनि डी.के.शेळके यांची कदीम पोलीस ठाणे, पोनि एम.बी.खेडकर यांची बदनापूर ठाणे, पोनि डी.पी.पवार यांची पोलीस अधीक्षकांचे वाचक म्हणून बदली झाली आहे.तर जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोनि एस.डी.हुंबे यांची परतूर पोलीस ठाणे, परतूर येथील पोनि एस.एच. गंदम यांची तालुका जालना, पोलीस अधीक्षकांचे वाचक सपोनि एस.डी.पायघन यांची टेंभुर्णी, कदीम जालना येथील सपोनि ए.एस.मोरे यांची जाफराबाद पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.पोलीस अधीक्षकांचे आदेश : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रक्रियाकदीम पोलीस ठाण्यातील पोनि एस.एम.लोहकरे यांची जिल्हा विशेष शाखेत तर बदनापूर पोलीस ठाण्यातील सपोनि व्ही.सी.राजपूत यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. चंदनझिरा पोलीस ठाण्यातील सपोनि एस.आर.सिरसाठ यांची अंबड व टेंभुर्णी येथील सपोनि एस.बी. भागवत यांची बदनापूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. अंबड येथील सपोनि बी. के. बलैय्या यांची नियंत्रण कक्षात तर टेंभुर्णी येथील पोउपनि डी.एस.साखळे यांची अंबड येथे बदली झाली आहे.घनसावंगी येथील पोउपनि ए.एस.बोडखे यांची परतूर, परतूर येथील पोउपनि पी.पी. माने यांची घनसावंगी तर सदर बाजार ठाण्यातील पोउपनि व्ही.आर. जाधव यांची मंठा येथे बदली झाली आहे. मंठा येथील पोउपनि आर.टी.चव्हाण यांची चंदनझिरा तर अंबड येथील पोउपनि एस.डी.शेजूळ यांची टेंभुर्णी ठाण्यात बदली झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बदली प्रक्रिया झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाJalna Policeजालना पोलीसTransferबदली