शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

परिक्षणासाठी शिवाराऐवजी आता प्रत्येक शेतातून घेणार माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:06 IST

 पायलट योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनितीचे माती परीक्षण मोफत करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देदीड वर्षात तब्बल चार लाख शेतकऱ्यांनी केले माती परीक्षणशेतीचे प्रगती कार्ड मोफत मिळणार

- गजानन वानखडे

जालना : जिल्हा मृद सर्वेशन आणि मृद चाचणी  विभागाच्या वतीने आता माती परीक्षणाच्या तंत्रात अनेक बदल केले आहेत. त्यानूसार पूर्वी एका शिवारातील माती घेऊन त्या शिवाराचा अहवाल दिला जायचा; आता प्रत्येक शेतकऱ्याकडून माती घेऊन त्यांच्या शेतीचे प्रगती कार्ड मोफत देण्यात येणार आहे. 

बेसुमार उत्पन्न घेण्याच्या नादात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते, किटकनाशकाचा वापर केला जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. याचा उत्पन्नावर परिणाम झाल्याने  शेतकऱ्याच्या आत्महत्यासारख्या घटना घडत आहेत. यामुळे राज्य शासनाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत माती परीक्षण करुन मृद आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील तब्बल चार लाख शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या शेतातील माती परीक्षण केले आहे. 

यात मोठ्या प्रमाणात स्फुरद, नत्र, आणि जस्त या मुलद्रव्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना माती परीक्षणासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाला गती देण्यासाठी यावर्षी केंद्र आणि राज्यशासनाने २०१९ - २०२० या वर्षासाठी  पायलट योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनितीचे माती परीक्षण मोफत करण्यात येणार आहे. 

पूर्वी १० हेक्टरच्या परिसरातील एका शेतकऱ्याच्या जमिनीतील माती नमुन्याची तपासणी करुन परिसरातील दहा शेतकऱ्यांना सारखाच अहवाल देण्यात येत होता. अनेकवेळा यात शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. यामुळे शासनाने यात बदल करुन आरोग्य पत्रिका वाटप केलेल्या प्रत्येक खातेदाराच्या शेतातील माती नमुन्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे  जिल्हा मृद सर्वेक्षण विभागाने  जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील ४३८३ शेतकऱ्यांच्या शेतातील माती नमुने घेतले आहेत. या तपासणीमुळे शेतात कोणत्या घटकाची कमतरता आहे, हे खरिपापूर्वी कळणार असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

तपासणीसाठी ४ हजार नमुने   शासनाने  माती परीक्षणाच्या  जुन्या  पध्दतीमध्ये बदल करुन आरोग्य पत्रिक वाटप केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील मातीच्या नमुने तपासणी घ्यावे, असे आदेश दिले आहेत. आतापर्यत ४ हजारपेंक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती नमुने तपासणीसाठी घेतले. - ए. एस. भवरे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीJalanaजालना