शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची होणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:42 IST

जालन्यातील कार्यालये चालतात रेल्वे वेळापत्रकावर अशा प्रकारचे वृत्त सोमवारी लोकमतमध्ये प्रकाशित होताच, त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील कार्यालये चालतात रेल्वे वेळापत्रकावर अशा प्रकारचे वृत्त सोमवारी लोकमतमध्ये प्रकाशित होताच, त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. विविध विभागात अधिकारी आणि कर्मचारी हे वेळेवर येऊन कार्यालयीन वेळेत थांबतात की, नाही याची शहानिशा करण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करून अचानक तपासणी करणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी दिली.सोमवारी लोकमतमध्ये जालन्यातील कार्यालयात ऐन दुष्काळातही अधिकारी आणि कर्मचारी हे भेटत नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन वृत्त प्रसिध्द केले होते. त्यात अनेक कार्यालयांमध्ये दुपारी ११ वाजेपर्यंत अधिकारी, कर्मचारी येत नसल्याचे दिसून आले. अनेक विभागांमध्ये बायोमेट्रीक पध्दती बसविल्या आहेत. परंतु त्या केवळ नावापुरत्या असल्याचे वास्तव आहे. त्या बायोमेट्रीक हजेरीच्या वेळेनुसारच वेतन देण्या संदर्भातील निर्देश आहेत. असे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. या वृत्ताची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, या संदर्भात राजेश जोशी म्हणाले की, कार्यालयात वेळेवर येणे आणि कार्यालयीन वेळेत सामान्य नागरिकांना भेटून त्यांची कामे करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. मात्र काही ठिकाणी याची अंमलबजावणी होत नसेल तर ही गंभीर बाब आहे. यापुढे शहरासह जिल्ह्यातील कार्यालयात अचानक भेटी देऊन अधिकारी, कर्मचा-यांचा आढावा घेणार असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :GovernmentसरकारJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना