शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

२५ ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 01:03 IST

बुलडाणा अर्बन को. आॅप. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून लुटल्या प्रकरणातील आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेची दोन व चंदनझिरा पोलीस ठाण्यातील एक पथक कार्यरत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बुलडाणा अर्बन को. आॅप. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून लुटल्या प्रकरणातील आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेची दोन व चंदनझिरा पोलीस ठाण्यातील एक पथक कार्यरत आहेत. घटनेनंतर जवळपास २५ ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली असून, आरोपींच्या लवकरच मुस्क्या आवळल्या जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.जालना येथील बडी सडक रोडवर बुलडाणा अर्बन को. आॅप. सोसायटीची मुख्य शाखा आहे. शाखेतील कर्मचारी गणेश कागणे व अरविंद देशमुख हे दोघे सोमवारी सकाळी मुख्य शाखेतून ३ लाख रूपयांची रोकड घेऊन दुचाकीवरून नवीन मोंढा भागातील शाखेकडे जात होते. नवीन मोंढा भागातील मारूती मंदिराच्या जवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना मारहाण करून ३ लाखाची रोकड लंपास केली होती. घटनेनंतर स्थागुशाचे पो.नि. राजेंद्रसिंह गौर, सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि शामसुंदर कौठाळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जखमीने दिलेल्या जबाबावरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. तसेच जवळील पोलीस ठाण्यांना माहिती देण्यात आली होती. तसेच घटनेनंतर आजवर या भागातील जवळपास २५ ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासण्यात आले आहे. यातून गुन्ह्यासंदर्भात काही माहिती, संशयित हालचालींची पाहणी पोलिसांनी केली आहे. शिवाय आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तीन पथके कार्यरत आहेत. लवकरच आरोपींना अटक होईल, असे पोलिसांनी सांगितले.घटनेनंतर सोमवारी रात्री शहरासह परिसरातील विविध भागांत पोलिसांनी कोंबिंग आॅपरेशन केले. या कोंबिंग आॅपरेशनमध्ये संशयितांची धरपकड करण्यात आली. यात विविध गुन्ह्यांतील दोन संशयितही पोलिसांच्या हाती लागले असून, लूटमार प्रकरणात सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांचीही तपासणी केली जात आहे.

टॅग्स :Robberyचोरीcctvसीसीटीव्हीJalna Policeजालना पोलीस