शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

अंतर्गत पाणीपुरवठा योजना अडकणार चौकशीच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:34 IST

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून राज्य सरकारने जालना पालिकेला १५० कोटी रूपये देऊ केले होते. त्यातून संबंधित कंपनीने आधी ९ जलकुंभ बांधणे आवश्यक असताना, आधी शहरातून पाईपलाइन टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून राज्य सरकारने जालना पालिकेला १५० कोटी रूपये देऊ केले होते. त्यातून संबंधित कंपनीने आधी ९ जलकुंभ बांधणे आवश्यक असताना, आधी शहरातून पाईपलाइन टाकली.ही पाईपलाइन टाकत असताना डीपीआरमध्ये जो मार्ग ठरवून दिला होता, त्यानुसार कामे न करता मनमानी धोरण राबवून आणि बाहुबली नगरसेवकांच्या दबावाखाली येऊन कंपनीने पाईपलाइन अंथरल्याने आज जालन्यातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. असे असतानाच पालिकेने संबंधित एजन्सीची जवळपास ९६ कोटी रूपयांची देयके अदा केली आहेत. या सर्व प्रकारणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती खा. रावसाहेब दानवे यांनी दिली. शनिवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, पूर्वीच्या केंद्र सरकारने जालन्यात पाणी आणण्यासाठी जायकवाडी ते जालना या योजनेसाठी २५० कोटी रूपये दिले . त्यानंतर जालन्याच्या वेशीवर पाणी पोहोचले होते, परंतु ते शहरातील विविध भागांत नेताना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन आपण स्वत: यात पुढाकार घेऊन १५० कोटी रूपये विशेष बाब म्हणून जालना पालिकेला दिले. त्यातून त्यांनी नेमलेल्या एजन्सीकडून दर्जेदार आणि डीपीआर प्रमाणे कामे करून घेणे अपेक्षित होते, परंतु या कामाकडे ना ज्यांच्या हातात पालिका आहे, त्यांनी लक्ष दिले नसल्याचा गंभीर आरोप केला. जालन्याच्या पाणीप्रश्नावर दानवे तसेच उपनगराध्यक्ष राजेश राऊत, भाजपचे पालिकेतील गटनेते अशोक पांगारकर, नगरसेवक भास्कर दानवे, संध्या देठे, सतीश जाधव, यांच्यासह अन्य नगरसेवकांची उपस्थिती होती.यावेळी दुपारी दानवे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी अंतर्गत जलवाहिनीसह अन्य प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी दानवेंनी खांडेकर यांना चांगलेच धारेवर धरल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरात ६१ टँकरने पाणीपुरवठाजालना शहरातील अनेक भागांमध्ये पंधरा ते वीस दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आपल्याकडे विविध भागांतील नागरिकांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपण शनिवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची संयुक्त बैठक घेतली. त्या बैठकीत आपण जालना शहरातील सर्व प्रभागांत एक टंँकर सुरू करण्यासह त्यांना गरज पडल्यास त्या टँकरच्या दोन फेºया वाढविण्याचे सांगितले. हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात येईल असे बिनवडे यांनी सांगितल्याचे दानवे म्हणाले. यावेळी राजेश राऊत यांनी देखील पाणीपुरवठा एजन्सीचे बिल देऊ नये, असा प्रस्ताव दिला होता या संदर्भात लेखी निवेदनही दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीraosaheb danveरावसाहेब दानवे