शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लॉजवर विसावा घेणाऱ्यांची माहिती येणार पोलीस दप्तरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 01:27 IST

अवैध धंद्यांचे केंद्र बनू पाहणाया काही लॉजवरील व्यवसायाला चाप लावण्यासाठी ग्राहकांची आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवैध धंद्यांचे केंद्र बनू पाहणा-या काही लॉजवरील व्यवसायाला चाप लावण्यासाठी ग्राहकांची आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील लॉज चालकांना ग्राहकांच्या नोंदी आता आॅनलाईन कराव्या लागणार असून, लॉजवर विसाव्यासाठी येणाऱ्यांची माहिती थेट पोलिसांच्या दप्तरी जाणार आहे. विशेषत: पोलिसांची विशेष पथके या वेबसाईटची (अ‍ॅप) नियमित पाहणी करणार आहेत.देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अनेक आरोपींनी लॉजवरच मुक्काम केल्याच्या घटना आहेत. शिवाय अनेक लॉजवर अवैध धंदे बिनधास्त सुरू असल्याचेही पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी शहर व परिसरातील लॉज चालकांची बैठक घेतली. या बैठकीत लॉज चालकांकडून त्यांच्या व्यवसायाची माहिती घेण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने या सर्व लॉज चालकांना लवकरच एक अ‍ॅप किंवा बेसाईटची लिंक देण्यात येणार आहे. लॉजवर मुक्कामी येणारे ग्राहक असोत किंवा काही तास विसावा घेण्यासाठी येणारे ग्राहक असोत; या सर्वांच्या नोंदी तात्काळ आॅनलाईन कराव्यात, अशा सक्त सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. ग्राहकांना आपल्या लॉजवरील रूम देताना त्यांची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्डसह इतर आवश्यक ती कागदपत्रे घ्यावीत. घेतलेल्या कागदपत्रांची माहिती तातडीने पोलिसांनी दिलेल्या लिंकवर किंवा अ‍ॅपवर तात्काळ टाकावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रथमत: जालना उपविभागातील लॉज चालकांची बैठक घेण्यात आली आहे. अनेकांना वेबसाईटची लिंकही देण्यात आली आहे. या लिंकद्वारे १५ फेब्रुवारीपर्यंत तात्काळ माहिती अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.वाहने खरेदी-विक्रीच्याही होणार नोंदीजालना शहरासह परिसरातून वाहन चोरी होण्याचे प्रकार अधिक आहेत. शिवाय शहरात जुन्या वाहनांची खरेदी- विक्री करणारे जवळपास ३० ते ३५ व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांनाही या बैठकीला बोलाविण्यात आले होते.लॉज चालकांप्रमाणेच या व्यावसायिकांनी वाहन खरेदीची आणि विक्रीची माहितीही प्रत्येक व्यवहारानंतर तात्काळ आॅनलाईन पध्दतीने भरण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत....तर होणार कारवाईअवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी जालना पोलिसांनी लॉज व वाहन खरेदी- विक्रीच्या नोंदी आॅनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोंदीवर विशेष पथके लक्ष ठेवून राहणार आहेत. जर कोणी या नोंदी करण्याकडे दुर्लक्ष केले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.अवैध धंदे नाहीत तर नियमित नोंदणी कराबैठकीस उपस्थित असलेल्या काही लॉज चालकांनी आमच्या लॉजवर अवैध धंदे चालत नाहीत, असे सांगितले. अवैध धंदे चालत नसतील तर आॅनलाईन नोंदणी करण्यास अडचण ती काय, असा प्रश्न करीत सर्व लॉज चालकांनी आपल्या लॉजवर थांबण्यासाठी येणाºया ग्राहकांच्या नोंदी आॅनलाईन कराव्यात, अशा सक्त सूचना पोलिसांनी या बैठकीत दिल्या आहेत. लॉच चालकांनी सूचनांचे पालन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाJalna Policeजालना पोलीसhotelहॉटेल