शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जालन्यातील उद्योग पाण्याअभावी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:36 IST

उद्योग, व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यातील स्टीलसह अन्य उद्योग पाण्याच्या कमतरेतेमुळे संकटात सापडले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उद्योग, व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यातील स्टीलसह अन्य उद्योग पाण्याच्या कमतरेतेमुळे संकटात सापडले असून, आज घडीला औद्योगिक वसहातीतील उद्योगांचा श्वास हा टँकरच्या भरवशावर सुरू आहे. जालना पालिकेने दररोज एमआयडीसला ५ एमएलडी पाणी द्यावे आणि महिन्याला ५० लाख रूपये घ्यावेत असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, तो सध्या नाकारण्यात आला असून, अंतर्गत जलवानीचे काम पूर्ण झाल्यावर यावर विचार करू असे पालिकेकडून सांगण्यात आले. तर औद्योगिक वसहातीसाठी पैठण येथील नाथसागरातून शेंद्रा आणि जालनासाठीची ४५० कोटी रूपयांची योजना मंजूर आहे, परंतु ती या ना त्या कारणाने रखडली आहे.एकीकडे दुष्काळाची दाहकता दिवेंसेदिवस वाढत असल्याने ग्रामिण भागातून शेकडो कामगार हे रोजगार शोधण्यासाठी जालन्यात येत आहेत. त्यातच जालन्यातील उद्योगही संकटात असल्याने त्यांना काम देणे अडचणीचे ठरत आहे. जालन्यातील प्रमुख उद्योग म्हणून स्टील उद्योगाकडे पाहिले जाते. या उद्योगातील सात बड्या स्टील उत्पादन करणाऱ्या उद्योगांना दररोज ५ एमलएलडी पाणी लागते आणि औद्योगिक विभागाकडून संपूर्ण एमआयडीसीला केवळ दीड एमलएलडी पाणी मिळत आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठी म्हणून उपयोगात आणले जात आहे.जालन्यातील अनेक स्टील उद्योजकांनी पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा कार्यान्वित केली असली तरी, तिच्या मर्यादा आहेत. त्यामुळे शेततळ्यांचा आधारही या उद्योगाने घेतला आहे. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने हे शेततळे भरले नसल्याने आज जवळपास लाखो रूपये हे टँकरच्या पाण्यावर उद्योजकांचे खर्च होत आहेत. एकूणच पाण्या अभावी शहरातील बांधकाम व्यवसायावरही परिणाम दिसून आला असून, अनेकांनी बांधकामे पुढे ढकलली आहेत.जालना : पाणीपुरवठा वाढविण्याचे प्रयत्नया संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक महांडळाचे औरंगाबाद येथील मुख्य अभियंता सुधीर नागे यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जालना आणि शेंद्रा येथील उद्योगांना थेट पाणीपुरवठा करण्यासाठी ४५० कोटी रूपयांची ७२ एमएलडीची योजना मंजूर आहे. परंतु ती योजना या ना त्या कारणाने रखडली आहे. या योजनेतून जायकवाडी धरणातून थेट जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात येणार होते; परंतु या योजनेचे काम सध्या कासव गतीने सुरू असले तरी ती लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. असे असले तरी जानेवारीअखेरपर्यंत जालन्याला सध्यापेक्षा दोनपट जास्तीचा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.- सुधीर नागे, मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ

टॅग्स :MIDCएमआयडीसीwater scarcityपाणी टंचाई