शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये मोफत प्रवासासाठी वय वाढविले; आता ‘लाडकी बहीण’साठी कमी करण्यास गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 11:51 IST

आता एसटीचा मोफत प्रवास नको, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वय कमी करण्यावर भर

- फकिरा देशमुख

भोकरदन : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये महाराष्ट्रभर सवलतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची संधी आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आधारवर स्वत:चे वय वाढविले होते. मात्र, आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ६५ वर्षांची अट ठेवली आहे. त्यामुळे आधारवर पुन्हा वय कमी करण्यासाठी महिलांची सीएससी सेंटरवर गर्दी वाढली आहे.

यात काही महिलांनी एसटीच्या प्रवासाचा फायदा घेण्यासाठी बनावट आधारकार्ड बनवले. त्यामुळे एसटीतून प्रवास करताना बनावट, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ओरिजनल आधार वापरणार आहेत.

सेतू केंद्रांवर वय कमी करण्यासाठी महिलांची गर्दीराज्य शासनाने २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लागू केली आहे. त्यामुळे आधारकार्डवर ६५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांनी वय कमीसाठी गर्दी केली.

आधार अपडेटसाठी काय कागदपत्रे लागतात?आधारकार्ड अपडेटसाठी महिलांना वयाचा पुरावा म्हणून टीसी, ग्रामपंचायत कार्यालयाचा रहिवासी दाखला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मोबाइल क्रमांकही अनिवार्य आहे.

तालुक्यात ज्येष्ठ महिलांची संख्या मोठी: भोकरदन तालुक्यात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मोफत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांची संख्या मोठी आहे. आता प्रवासापेक्षा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक महिला आपले आधारकार्डवरील वय कमी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. राज्य शासनाने लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर भोकरदन तालुक्यातील सर्वच सीएससी सेंटरवर वय कमी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. काही ठिकाणी तर रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. आधारकार्ड अपडेट करण्यासाठी किमान २१ दिवसांचा कालावधी लागत आहे.

सेतू केंद्र चालक काय म्हणतात....- बसमधील मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आधारकार्डवर ६५ वर्षांपेक्षा अधिक वय वाढवले आहे. आता ते कमी करीत आहे. -  पवन राजू मोरे, सेतू केंद्र चालक

- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महिलांनी ओरिजनल आधारकार्ड बाहेर काढले आहे. एसटीसाठी बनावट केल्याचे दिसले. -  योगेश शेंद्रे, सेतू केंद्र चालक

टॅग्स :TahasildarतहसीलदारJalanaजालनाState Governmentराज्य सरकार