शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात होणार वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:39 IST

येत्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन पेरणीला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पे-यात १७ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मागील वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात घट झाल्याने शेतक-यांना मोठा फटका बसला. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन पेरणीला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पे-यात १७ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित आहे.जिल्ह्यात यंदा सहा लाख आठ हजार ६३५ हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खरीप क्षेत्रात २० हजार हेक्टरने वाढ होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मागील वर्षी जिल्ह्यात दोन लाख ७९ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाचे गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. परिणामी कापूस उत्पादन घटल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले. बोंडअळी बाधित शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, पंचनामे पूर्ण होऊन चार महिने उलटूनही शेतक-यांच्या एकही रुपयांची मदत मिळालेली नाही. शिवाय बोलगार्ड दोन हे कपाशी तंत्रज्ञान कमकुवत झाल्याने कपाशीवर या खरिपातही बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कापूस उत्पादनावर मोठा खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्यास नुकसान नको म्हणून शेतकरी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका या कमी कालावधीच्या नगदी पिकांचा विचार करत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र