शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिल्या व्हर्चुअर सायन्स लॅबचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:45 IST

हॉर्वर्ड, कॅब्रिंज, डॅनिश, एमआयटी संस्थेसह अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी संशोधन करुन तयार केलेल्या व्हर्चुअल प्रयोगशाळेचे जालन्यात बुधवारी उदघाटन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हॉर्वर्ड, कॅब्रिंज, डॅनिश, एमआयटी संस्थेसह अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी संशोधन करुन तयार केलेल्या व्हर्चुअल प्रयोगशाळेचे जालन्यात बुधवारी उदघाटन करण्यात आले. रोटरी क्लब आॅफ जालना मिडटाऊनच्या वतीने शहरातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. देशातील ही पहिलीच प्रयोगशाळा असेल, असा दावा रोटरी क्लबच्या पदाधिका-यांनी केला आहे.जालन्यातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयात बुधवारी या प्रयोगशाळेचे उदघाटन रोटरी आंतरराष्ट्रीयचे माजी अध्यक्ष आणि रोटरी फाऊंडेशनचे विश्वस्त कल्याण बॅनर्जी व व्यंकटेश सी. हण्णा यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. अनुप करवा यांच्या संकल्पनेतून व्हर्चुअल प्रयोगशाळेचा उपक्रम राबविण्यात येत आहे.या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांत ई-लर्निंगसह विज्ञान विषयाबाबत आवड निर्माण होणार आहे. विज्ञान आणि इतर विषयांतील जिज्ञासू वृत्ती जागृत करण्याचे काम या प्रयोगशाळेत होणार असल्याचे बॅनर्जी म्हणाले. माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा प्रकल्प वा उपक्रम राबविला जात आहे. यातून विद्यार्थी अधिक सक्षम होऊन यातून अनेक शास्त्रज्ञ घडू शकतील, असे बॅनर्जी म्हणाले.डॉ. अनुप करवा म्हणाले की, या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना भौतिक घडामोडींचे निरीक्षण करता येणार आहे. वारंवारता आणि सातत्य पद्धतीने हे अनुभवता येऊ शकणार आहे. तसेच यातून विद्यार्थ्यांना संवाद आणि चेह-यांच्या हावभावांवरुन प्रयोगाचा अभ्यास करु शकणार आहेत. मुंबईत जवाहरलाल नेहरु प्लॅनेटोरियमप्रमाणेच या प्रयोगशाळेचा अनुभव विद्यार्थी घेऊ शकतील. आगामी काळात संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवून देशाच्या उभारणीत योगदान देण्याचा मानस मान्यवरांनी बोलून दाखवला. या कार्यक्रमास शहरातील विविध शाळांतील एक हजार विद्यार्थ्यांसह शिक्षक, रोटरी परिवार आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.