शाळा बंद असल्याने मुलांना नेहमीप्रमाणे मुक्त वातावरणात वावरता येत नाही. ही मुलं पालकांच्या अभ्यासासह वेळोवेळच्या सूचनांनी कंटाळली आहेत. तसेच मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करीत नाहीत, यांसह इतर तक्रारी पालक करीत आहेत. केवळ शाळा बंद असल्याने या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे मुलांसह पालकांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असून, शाळा सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे.
मुलांच्या समस्या...
सतत मोबाईल हातात घेऊन अभ्यास करावा लागतो.
अभ्यासासाठी आई-वडिलांचा तगादा लावला जातो.
खेळण्यासाठी, फिरण्यासाठी बाहेर जाऊ दिले जात नाही.
मित्रांना पूर्वीप्रमाणे भेटता येत नाही, त्यांच्याशी बोलता येत नाही.
पालकांच्या समस्या...
मुलं ऑनलाईन अभ्यासामध्ये अधिकचे लक्ष देत नाहीत.
मोबाईलवर अभ्यास कमी आणि कार्टुन पाहण्यासह गेम खेळतात.
दिलेला अभ्यास वेळेवर करण्याकडे लक्ष देत नाहीत.
बाहेर जाण्याचा हट्ट धरून विनाकारण त्रास देतात.
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात..
कोरोनामुळे अनेकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. मुलांचे शिक्षण महत्त्वाचे असले तरी, त्यांची समजून घेण्याची मानसिकता अधिक विकसित झालेली नसते. त्यामुळे मुलांशी योग्य प्रकारे सुसंवाद साधून त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करावेत.
- डॉ. मंगला मुळे
कोरोनात मानसिकता बिघडत असल्याच्या तक्रारी अनेक आहेत. यात पालक, लहान मुलांचाही समावेश आहे. आपल्याला चिडचिड होऊ नये, मानसिक त्रास होऊ नये यासाठी आपण मुलांना समजून घेऊन त्यांच्याशी सतत संवाद साधावा. तसेच ठराविक वेळेत अभ्यास करून घ्यावा.
- डॉ. संदीप पवार