शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

योजनांची गतीने अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:20 IST

मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस व शेळ्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्सायासाठी संबंधीत यंत्रणांनी गतीने काम करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस व शेळ्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्सायासाठी संबंधीत यंत्रणांनी गतीने काम करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये सोमवारी दुधाळ जनावरे वाटप प्रकल्पाच्या आढावा बेठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळभ खोतकर यांनी वरील निर्देश दिले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी.खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, ेमुख्यधिकारी संतोष खांडेकर, शिवसेना जिल्हा प्रमख भास्कर अंबेकर, पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद मोरे, वंसत जगताप, विष्णू पाचफुले तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि बँकांचे शाखा प्रमुख, विमा कंपनीचे व्यवस्थापक आदीची उपस्थिती होती.खोतकर म्हणाले की, शेतकऱ्यांना शेती बरोबरच जोडधंदा म्हणून दूध विक्रीचा व्यवसाय करता यावा यासाठी दुधाळ जनावरे वाटपाचा पथदर्शी प्रकल्प जालना जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येत आहे. तसेच या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज तातडीने भरुन घेण्यात यावेत. या लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानासाठी बँकांनी लाभार्थ्यांना सहतोपरी सहकार्य करावे. लाभार्थ्यांना उच्च प्रतिचे जनावरे देण्यासाठी राज्यात उपलब्ध असतील तर खरेदी करण्यात यावे, अथवा परराज्यातून दर्जेदार अशा जनावरांची खरेदी करण्यात यावी असे खोतकरांनी सांगितले. या बैठकीत उपस्थित अधिकारी, कर्मचा-यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने खोतकर जाम चिडले होते. त्यांनी हलगर्जी करणाºया अधिका-यांना कडक शब्दात सुनावले. काही माहिती विचारली असता ती देखील समाधानकारक देता न आल्याने पुढील बैठकीत सर्व आवश्यक ती माहिती सोबत ठेवण्याच्या सूचना दिल्या.जालना : प्रकल्प यशस्वी केल्यास राज्यभर राबवणारजनावराचा विमा शंभर टक्के काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत जालना जिल्ह््यामध्ये हा प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात याच धर्तीवर प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री खोतकर यांनी सांगितले. पशुपालकांकडे असलेल्या जनावरांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी त्यांना ठरवून दिलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी थांबून योग्य ती सेवा देण्याचे निर्देशही खोतकर यांनी यावेळी दिले. गेल्या काही दिवसांमध्ये अंबड, गोलापांगरी येथे उपचारा अभावी जनावरांचा तडफडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरgovernment schemeसरकारी योजना