शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आयसीटीमुळे उद्योगांना चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:04 IST

आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची मुहूर्तमेढ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोवण्यात येणार आहे. ही संस्था मराठवाड्यातील उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा उचलणार असून, यामुळे उद्योगवाढीला चालना मिळणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची मुहूर्तमेढ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोवण्यात येणार आहे. ही संस्था मराठवाड्यातील उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा उचलणार असून, यामुळे उद्योगवाढीला चालना मिळणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता सिरसवाडी परिसरात आयसीटी संस्थेच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर वृंदावन हॉलमध्ये जााहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव, आ. राजेश टोपे, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. सुभाष झांबड, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, आयसीटीचे कुलगुरू डॉ. जी.डी. यादव, कुलपती रघुनाथ माशेलकर आदींची उपस्थिती राहणार आहे. जालन्यात ही संस्था यावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण स्वत:, येथील उद्योजक आणि कुलगुरू डॉ.जी.डी यादव यांनी पाठपुरावा केला. त्याचे आज चीज होणार असल्याने मोठे समाधान वाटत असल्याचे दानवे म्हणाले. दरम्यान आयसीटी प्रमाणेच ड्रायपोर्टमुळे उद्योगाला चालना मिळणार आहे. या दोन महत्वाच्या बाबींसह जालन्यातील सिमेंटचे रत्स्यांसाठी १०० कोटी रुपये मिळणार आहेत, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी. आ. अ‍ॅड. विलास खरात, भास्कर दानवे, किशोर अग्रवाल, अर्जुन गेही, आशिष मंत्री, मनोज पांगारकर, अशोक पांगारकर आदींची उपस्थिती होती.आयसीटी ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळातील असून, १९३३ मध्ये मुंबईत सुरू करण्यात आली होती. या संस्थेने बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तसे अभ्यासक्रम तयार केले. त्यामुळेच या संस्थेला देशात अत्यंत प्रतिष्ठेचे स्थान आहे. आता पर्यंत या संस्थेने देशातील आघाडीचे ५०० उद्योजक निर्माण केल्याची माहिती कुलगुरू डॉ.जी. डी. यादव यांनी दिली.४जालन्यात जूनपासून अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पाच वर्षाची पदवी तसेच पदव्युत्तर आणि नंतर डॉक्टरेटसाठी येथे संशोधन आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये पाच वर्षाच्या अभ्यासक्रमात दोन वर्ष विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगात काम करावे लागणार असल्याने कामाचा अनुभव मिळून विद्यार्थ्यांत परिपक्वता येईल.पीएचडी करणाऱ्यांना येथील उद्योजकांकडून संशोधनासाठी विद्यावेतनही देण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यात जास्तीत जास्त उद्योजक घडविण्याचे आमचे उदिष्ट असल्याचे कुलगुरू यादव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसraosaheb danveरावसाहेब दानवे