शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आयसीटीमुळे मराठवाड्यात कुशल मनु्ष्यबळासह उद्योजक निर्माण होतील - मुख्यमंत्री फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:12 IST

मराठवाड्यात उद्योगासाठी लागणारे कुशल मनु्ष्यबळ घडविण्याबरोबरच आयसीटी उद्योजक घडवेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देरसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे जालना येथील सिरसवाडीत फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. मराठवाड्यात आयसीटी ही संस्था कौशल्यपूर्ण आणि उद्योजक निर्माण करण्याचे काम भविष्यात करणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले

जालना : मराठवाड्यात उद्योगासाठी लागणारे कुशल मनु्ष्यबळ घडविण्याबरोबरच आयसीटी उद्योजक घडवेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे जालना येथील सिरसवाडीत फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन करण्यात आले. सिरसवाडी येथील नियोजित जागेवर सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम पार पडला. कोनशिलेच्या अनावरणानंतर शहरातील हॉटेल गॅलेक्सी  येथील सभागृहात मुख्य कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याला प्रगतीपथावर घेऊन जायचे असेल तर, राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यासह मागास राहिलेल्या भागाचा विकास करणे महत्वाचे आहे. त्याशिवाय राज्याचा सर्वांगिण विकास होणार नाही. 

उद्योजक निर्माण होतील मराठवाडा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या ९० टक्के निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे. आयसीटी हा याचाच एक भाग आहे. उद्योगासाठी गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ महत्त्वाचे आहे. कारण मनुष्यबळ हे या प्रक्रियेत चुंबकाचे काम करते. पुण्यात उत्तम मनुष्यबळ असल्याने तिथे उद्योग आले. मराठवाड्यात आयसीटी ही संस्था कौशल्यपूर्ण आणि उद्योजक निर्माण करण्याचे काम भविष्यात करणार आहे. त्याचबरोबर येथे उभारण्यात येत असलेल्या सीड्स पार्कलाही या संस्थेचा लाभ होणार आहे,  असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalanaजालनाState Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसraosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकर