शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 14:25 IST

मनोज जरांगे पाटील यांनी आज आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मागील नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. "आज आपण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत. जे लोक इथं भेटण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी आपण थोडा वेळ थांबू आणि ४ ते ५ वाजता उपोषण स्थगित करू. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू आणि त्रास देणाऱ्यांना सरळ करू," असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या औचित्यावर १७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून मनोज जरांगे यांनी उपोषणास सुरुवात केली होती. "पुन्हा आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही. सरकारला आम्ही शेवटची संधी देत आहोत, जर आता मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर नंतर काहीही बोलून उपयोग नाही," असा इशारा आंदोलनाच्या सुरुवातीला मनोज जरांगेंनी दिला होता. मात्र मागील नऊ दिवसांत त्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने आज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेत निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

सरकार दरबारी नेमक्या काय हालचाली सुरू?

मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नुकतीच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सगेसोयरे अधिसूचनेसह हैदराबाद गॅझेटबाबत महत्त्वाची चर्चा झाली. "मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सगेसोयरे बाबत काढावयाच्या अंतिम अधिसूचनेचे प्रारूप तयार करण्याविषयी तसेच हैदराबाद, मुंबई व सातारा गॅझेटबाबत निवृत्त न्या. गायकवाड व न्या. शिंदे यांचा समावेश असलेल्या सल्लागार मंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली. याबाबत सह्याद्री अतिथीगृह इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं," अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री तथा राठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी बैठकीनंतर दिली होती.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणjalna-acजालना