शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा सरकारचा 'कार्यक्रम' केला म्हणून आज या कार्यक्रमास आलो, मुख्यमंत्र्यांचा मिश्कील टोला

By संजय देशमुख  | Updated: February 2, 2023 18:27 IST

जलतारा प्रकल्पाला शासनाचे सहकार्य: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

जालना : शेतकऱ्यांना पाणीदार बनविणारा आर्ट ऑफ लिव्हिंगचा जलतारा प्रकल्प हा अत्यंत क्रांतीकारी प्रकल्प आहे. यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासह आत्महत्या थांबण्यास मदत होईल, त्यामुळे या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारचे पूर्णत: ते सहकार्य राहिल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, 'तेव्हा सरकारचा कार्यक्रम केल्याने' आजच्या या जलतारा कार्यक्रमास येवू शकलो, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. 

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने वाटूर फाटा (ता.परतूर) येथे गुरूवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, मंत्री उदय सावंत, आ. संजय सिरसाट, अभिमन्यू खोतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिंदे म्हणाले, पूर्वीच्या शासनाने बंद केलेली जलयुक्त शिवार योजना आम्ही सुरू केली. त्यामुळे जलसंधारण वाढत आहे. वॉटर ग्रीड योजनाही पूर्ववत करण्यात आली असून, त्याची चांगली अंमलबजावणी होत आहे. गुवाहाटी गेल्याचा किस्सा सांगून तेथेही श्री श्री रविशंकर यांचा आशीर्वादाचा फोन आल्याचे आवर्जुन सांगितले. 'तेव्हा सरकारचा कार्यक्रम केल्याने' आजच्या या जलतारा कार्यक्रमास येवू शकलो, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. भविष्यात महाराष्ट्रात गुंतवणूक वाढीसह रोजगार वाढीला प्राधान्य देणार असल्याची घोषणा आम्ही दाओसहून आल्यानंतर केली. त्यामुळे राज्यात गुंतवणूक वाढून उद्योग, धंदे विकसित होतील, असेही ते म्हणाले.

चिंता करू नका, तणावमुक्त व्हाश्री श्री रविशंकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तणावमुक्त व्हावा, चिंता करू नका. जीवनात सुख- दु:ख येत असतात. त्यांना दूर करण्यासाठी ध्यान साधनाही महत्त्वाची आहे. आर्टट ॲफ लिव्हिंगच्या माध्यमातून जलतारा प्रकल्प देशातील एक लाख गावात राबविण्याची घोषणाही श्री श्री रविशंकर यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJalanaजालना