शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

'कर्ज फेडण्यासाठी शेती साथ देत नाही, माझ्यानंतर कुटुंबाला सांभाळण्याची विनंती करून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 13:28 IST

शेतकरी देविदास विठ्ठलराव मात्रे यांची हालदोला शिवारात ७ एकर शेती आहे. त्यांच्या डोक्यावर बँक आणि खाजगी सावकाराचे कर्ज होते.

ठळक मुद्देकर्जफेडीसाठी बँकेमधून त्यांना दोन नोटीस आल्या होत्या. सावकाराने चेक परत न देता आणखी रक्कम मागितली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

बदनापूर  : तालुक्यातील हालदोला येथे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून शेतात आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडली. देविदास विठ्ठलराव मात्रे ( ५२ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कर्ज फेडण्यासाठी बँकेचा तगादा आणि खाजगी सावकाराकडून मिळणाऱ्या धमक्या याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी एका चिट्ठीमध्ये नमूद केले आहे. 

शेतकरी देविदास विठ्ठलराव मात्रे यांची हालदोला शिवारात ७ एकर शेती आहे. त्यांच्या डोक्यावर बँक आणि खाजगी सावकाराचे कर्ज होते. कर्जफेडीसाठी बँकेमधून त्यांना दोन नोटीस आल्या होत्या. त्यांनी बँकेत भेट देऊन मुद्दल भरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, अधिकाऱ्याने काहीएक न ऐकता घरावर जप्ती करण्याचा इशारा दिला. यामुळे ते व्यथित झाले होते. तसेच शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी घरखर्च आणि शेतीसाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडून सुद्धा सावकाराने चेक परत न देता आणखी रक्कम मागितली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यासर्व प्रकाराने देविदास मात्रे नैराश्यात गेले होते. यातूनच त्यांनी आज पहाटे शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,तिन मुले,एक मुलगी,जावई,सुना असा परीवार आहे. 

दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब मात्रे यांनी सांगितले की, शेतकऱ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक शेलगावचे ९ लाख रुपये आणि गृहकर्ज व ४ क्रॉप लोन होते. मी सोमवारी त्यांच्यासोबत या बँकेत गेलो होतो. त्यांनी बँक अधिकाऱ्यांना कर्ज प्रकरणात मुद्दल भरायला तयार असून तडजोड करण्याची विनंती केली. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही. उलट कठोर पवित्रा घेत आम्ही तुमच्या घरावर जप्ती आणू असे सुनावले होते. त्यामुळे ते व्यथित झाले होते अशी माहिती दिली. 

सध्या मी कर्जबाजारी आहेदेविदास विठ्ठलराव मात्रे यांनी एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यानुसार, मला बँकेच्या दोन वेळा नोटीसा आल्या असून दोन वेळेस बँकेत बोलावले. आम्ही घरावर जप्ती आणू असे त्यांनी सांगितले. सध्या मी कर्जबाजारी आहे. कर्ज फेडण्यासाठी मला चार ते पाच वर्षांपासून शेतीने साथ दिली नाही. या कारणाने, मी सावकाराकडून कर्ज घेतले. ते व्याजासगट कर्ज परत केले. परंतु, सावकाराने माझे चेक परत दिले नाही, उलट जास्त पैसे दया नाही तरी जिवे मारू अशा धमक्या दिल्या. सावकाराकडून माझ्या कुटुंबास त्रास झाला. माझ्याकडे कोणतेच कर्ज राहीले नाही. मी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. असे नमुद करून त्यांनी खाली सही केली आहे. तसेच  जवळच्या नातेवाईकांची नावे लिहून त्यांनी कुटुंबाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याJalanaजालना